
Raj Purohit On Narendra Modi: नुकतेच राज्यसभेवर नियुक्त झालेले ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांच्या सन्मानार्थ शनिवारी दादरच्या वसंत स्मृती सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भाजप नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे चर्चा रंगली आहे. सत्कार समारंभात बोलताना राज पुरोहित म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न थकणारे, न थांबणारे नेते आहेत. त्यांची काम करण्याची ऊर्जा अद्वितीय आहे. ते विष्णूचे अकरावे अवतार आहेत. आपण अमेरिकेला जाऊन आलो की दोन दिवस जेट लॉक लागतो. त्यानंतर आपल्याला विश्रांती घ्यावी लागते. पण मोदी फिनलंड, इंग्लंड दौरा करून अहमदाबादमध्ये दोन दिवसांत 22 उद्घाटन करतात.” असे ते म्हणाले.
निकम त्यांच्या भाषणात काय म्हणाले?
कार्यक्रमात उज्वल निकम यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना भाषेपासून ते राजकारणापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “मी मराठीत भाषण करतो म्हणजे मला इतर भाषा आवडत नाहीत असं नाही. मातृभाषा ही आत्म्याची, तर इतर भाषा बुद्धीची गरज आहेत,” असं ते म्हणाले. राज्यसभा सदस्यत्व स्वीकारताना आलेल्या अनुभवाविषयी बोलताना निकम म्हणाले, “शपथ मराठीत घेतली, पण बाजूला सोनिया गांधी होत्या, त्यांना समजावे म्हणून इंग्रजीत सांगितले की ही मराठी भाषा आहे.”
राजकारणात प्रवेश का केला?
राजकारणात प्रवेश का केला, यावर स्पष्टीकरण देताना निकम म्हणाले, “मला राजकारणात यायचं नव्हतं. पण देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या आग्रहामुळे मी भाजपचा स्वीकार केला.” तसेच त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटलं, “मी काही मतांनी हरलो, त्यामुळे काही जणांना वाटलं मी संपलो, पण मी हरलो होतो, विझलो नव्हतो. माझ्या कामाचं मूल्य विरोधकांना समजलं नाही.”
निकम यांनी यापूर्वी काही पक्षांकडून मिळालेल्या ऑफर्स नम्रपणे नाकारल्या होत्या, मात्र भाजपमध्ये राष्ट्रनिष्ठा व देशप्रेम असल्याचं स्पष्ट करत त्यांनी भाजपची निवड केली, असंही त्यांनी भाषणात नमूद केलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.