digital products downloads

पक्ष बदलला, कलह ताेच: मविआत असताना अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप होता, महायुतीत असतानाही तेच सुरू – Chhatrapati Sambhajinagar News

पक्ष बदलला, कलह ताेच:  मविआत असताना अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप होता, महायुतीत असतानाही तेच सुरू – Chhatrapati Sambhajinagar News


महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अजित पवार निधी देत नाहीत, असा आरोप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड पुकारताना केला होता. आता सरकार बदलले तरीही निधीचा कलह कायम आहे. तशा तर एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार अशा कुरबुरी सुरूच होत्या. पण शनिवा

.

ग्रामीण भागात सध्या वर्चस्वाची लढाई सुरू

शिरसाटांच्या हल्लाबोलवर सध्या एकनाथ शिंदेंनी मौन बाळगले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, लाडक्या बहिणीमुळे तर विभागांना निधी मिळत नाही. दरम्यान, या दोन्ही पक्षांतील वादाचा सध्यातरी महायुती सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र, त्याचे पडसाद महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत पाहण्यास मिळतील. महायुतीला याचा हमखास फटका बसेल, अशी चिन्हे आहेत. कारण सध्याच ग्रामीण भागात या दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची जोरदार लढाई सुरू आहे. त्याचा फायदा मविआला होऊ शकतो.

जुने भांडण : अजित पवार कायम निशाण्यावर

१. मविआत असताना अजित पवार निधी देत नव्हते. पण उद्धव ठाकरे त्याकडे दुर्लक्ष करत होते असे शिरसाटांचे म्हणणे होते. २. शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले होते, राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी वाटप करून अजित पवार यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. ३. आमदार महेश शिंदे म्हणाले होते की, शिवसेनेच्या आमदारांना ५० ते ६० आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना ७०० ते ८०० कोटींचा निधी दिला जात होता. ४. वेळेवर निधी मिळत नसल्याने एसटी महामंडळ अडचणीत असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले होते.

शिरसाटांचा संताप म्हणजे देखावा : वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, लाडक्या बहिणींसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांचा निधी वळवल्यानंतर शिरसाट बोलतात. त्यांना हे माहिती असणारच. त्यामुळे त्यांचा संताप व्यक्त करणे म्हणजे देखावा आहे.

मंत्रिमंडळ उपसमिती, मविआ फोडाफोडीमुळे हा हल्लाबोल

सत्तेत सहभाग, निधी व खातेवाटप, रायगडचे पालकमंत्रिपद यावरून शिंदेसेना-अजित पवार गटात धुसफूस सुरू होती. आता तर शिरसाटांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. मात्र, या हल्ल्यामागे निधी वळवणे यापेक्षा मंत्रिमंडळ उपसमिती, मविआत फोडाफोडी ही खरी कारणे आहेत. सूत्रांनी सांगितले की, या वादाची उघड सुरुवात ११ एप्रिल रोजी झाली. जेव्हा एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्याकडे अजित पवार आमच्या फायली अडवतात, अशी तक्रार केली होती. त्यानंतर अजित पवारांसह सर्व मंत्र्यांच्या फायली शिंदेंमार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे जातील, असे आदेश काढण्यात आले. त्यावरून अजित पवार नाराज होताच कामे गतिमान करण्यासाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली. तेथे पुन्हा शिंदेविरुद्ध पवार अशी ठिणगी पडली. १ मे रोजी ध्वजवंदनाची संधी शिंदेसेनेचे मंत्री गोगावलेंना देण्यात आली नाही. यामध्ये एका राजकीय घडामोडीची भर पडली. जळगाव जिल्ह्यातील शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा विरोध डावलून मविआतील पाच माजी आमदारांना अजित पवार गटात प्रवेश देण्यात आला. त्यामुळेच अजित पवारांवर अंकुश ठेवण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून मंत्री शिरसाट यांनी निधी वळवल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याला भाजपचाही छुपा पाठिंबा आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजप प्रवेश रोखला होता शिंदेसेनेच्या विरोधामुळे

ज्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे ते सर्वच भाजपत येण्यास इच्छुक होते. पण जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी त्यास विरोध दर्शवल्याने त्यांना आम्ही भाजपत घेतले नाही. अजित पवारांनी मात्र, महायुतीत कोणाशीही चर्चा न करता प्रवेश दिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलू. ज्यांना प्रवेश द्यायचा त्यांचा इतिहास आणि आर्थिक व्यवहार पाहून आम्ही निर्णय घेतो. अजित पवारांनीही तसे करायला हवे होते, असे मतही महाजनांनी व्यक्त केले.

दिव्य मराठी इनसाइड स्टोरी

विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात लढलेल्यांना प्रवेश देऊन अजित पवारांनी प्रोटोकाॅलचा भंग केल्याची टीका भाजप नेते जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली. जळगाव जिल्ह्यातील ४ आणि धुळे जिल्ह्यातील एका माजी आमदाराचा मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल करताना नाराजीही व्यक्त केली.

मविआमधील कोणालाही प्रवेश देताना त्या जिल्ह्यातील इतर मित्रपक्षांच्या नेत्यांना विश्वासात घ्यावे, असे फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांमध्ये २ महिन्यांपूर्वी ठरले होते. तो शिष्टाचार (प्रोटोकॉल) पवारांनी मोडीत काढला, असे महाजन यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, या संदर्भात आम्ही अजित पवारांशी बोलणार आहोत. अर्थात महाविकास आघाडीला सोडून कोणी महायुतीकडे येत असेल तर एक प्रकारे तीही चांगलीच गोष्ट आहे. आता आम्हालाही कोणालाही पक्षात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपत इनकमिंगची संख्या मोठी आहे. त्यांना आम्ही प्रवेश दिला तर अजित पवार हरकत घेणार नाहीत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp