
पिंपरी चिंचवड पाेलिस ठाण्याचे हद्दीत डुडुळगाव येथे २८ फेब्रुवारी राेजी वनविभागाच्या डाेंगराजवळ निर्जन ठिकाणी अामुसाब साहेबलाल मुल्ला (वय- ३४) याचा काेणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राचे सहाय्याने पाेटावर ठिकठिकाणी वार करुन गंभीर जखमी करुन खून केल्याचा प्रकार उघडकीस अाला. याप्रकरणात गुन्हे शाखा युनिट तीन व गुंडा विराेधी पथकाने तपास केला असता, मयताचे पत्नीने प्रियकरासाेबत लग्न करण्यासाठी प्रियकराशी संगनमत करुन पतीचा निघृण खून केल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. याप्रकरणी पसार झालेल्या अाराेपीस पाेलीसांचे पथकाने उत्तप्रदेश मध्ये जाऊन अटक करुन अाणल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलीस उपायुक्त संदीप डाेईफाेडे यांनी दिली अाहे. अब्दुल मकबुल मलिक (वय-४५,रा. डुडुळगाव, ता.हवेली,पुणे, मु.रा. साबरपुर, ता.मनकापुर, जि.गाेंडा, उत्तरप्रदेश) अाणि जेबा अमुदसाब मुल्ला (३०) अशी याप्रकरणी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहे. याप्रकरणी दिघी पाेलीस ठाण्यात अाराेपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे. सदर गुन्हयाचा तपास पाेलीस करत असताना, संबंधित अज्ञात अाराेपी विरुध्द काेणताही पुरावा मिळून येत नव्हता. सदर अज्ञात अाराेपी विरुध्द पुरावा शाेधण्याचे काम अाव्हानात्मक हाेते. तांत्रिक विश्लेषणात्मक तपास करुन देखील उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने स्थानिक नागरिकांकडे पाेलीसांनी तपास करत सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी गुन्हे शाखा युनिट तीनचे वपाेनि जितेंद्र कदम यांचे पथक व गुंडा विराेधी पथकाचे सपाेनि हरीश माने यांचे पथकास माहिती मिळाली की, मयताचे घराशेजारी रहाणारे भंगार व्यवसायिक यांचेकडे चाैकशी दरम्यान, भंगार व्यवसायिक पैकी एक संशयित व्यक्ती हा घटनेच्या दिवशी सकाळपासून त्याचे उत्तरप्रदेश मधील गाेंडा या मुळगावी गेला अाहे. त्यानुसार पाेलीसांचे एक पथक उत्तरप्रदेश येथे जाऊन त्यांनी अाराेपीचा शाेध घेतला असता, अापले अस्तित्व लपवून अाराेपी लपण्याचा प्रयत्न करत हाेता. परंतु पाेलीसांनी त्यास शिताफीने अटक केली अाहे. त्याच्या चाैकशीत त्याने मयताचे पत्नीसाेबत सदर गुन्हा केल्याची कबुली दिली अाहे. याप्रकरणी पुढील तपास दिघी पाेलीस करत अाहे. |
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.