
चिपळूणचे आमदरा आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वेगळं रुप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आज त्यांच्या चिपळूण येथील नूतनीकरण केलेल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं. दुग्धशर्करा योग म्हणजे त्यांत्या पत्नी सुवर्णा जाधव यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसाचं सेलिब्रेशन नवीन कार्यालयात उत्साहाने साजरं करण्यात आलं. यावेळी भास्कर जाधवांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला.
पत्नी सुवर्णा जाधव यांच्या वाढदिवसाचा केक कापत असताना त्यांनी “बार बार दिन ये आए..बार बार दिल ये गाए… ‘ हे गाणं म्हणतं वाढदिवस साजरा केला. यावेळी भास्कर जाधव यांच्या सहकाऱ्यांसोबत केक कापून आनंद साजरा केला. भास्कर जाधव यांचं कुटूंब यावेळी उपस्थित होतं. भास्कर जाधव यांनी पत्नीसाठी गाणं गायल्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांना वेगळा अंदाज पाहता आला.
राजकारणात आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले भास्कर जाधव कौटुंबिक सोहळ्यालही रमताना दिसतात. चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी शिमगोत्सव साजरा करतानाही भास्कर जाधव दिसतात. यावेळी भास्कर जाधवग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन तल्लीन होऊन नाचताना दिसले. सोशल मीडियावर हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
भास्कर जाधव यांनी झी चोवीस तासमधील विशेष मुलाखत ‘टू द पॉईंट’ मध्ये अनेक गौप्य स्फोट केले. यामध्ये शिवसेनेची कॉंग्रेस झाली म्हणजे नेमकं काय? असा सवाल करताच भास्कर जाधव यांनी शिवसेनेचं स्ट्रकचर सांगत म्हणाले, ‘पूर्वी शिवसेनेचं स्ट्रकचर होतं. शिवसेना प्रमुख त्यानंतर शिवसेनेचे 13 नेते, त्यानंतर जिल्हा प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख आणि त्यानंतर शाखा प्रमुख अशा पद्धतीची शिवसेनेची कार्यप्रणाली होती. आज आपण जर पाहिलं तर एक तालुका प्रमुख नेमायचा असेल तर तालुका प्रमुखाच्या बरोबरीनं तालुका समन्वय, एक तालुका संघटक, एक तालुका सचिव, एक तालुका कोण आणखीन. ए
का पदात्या भोवती आपण किती पद निर्माण करणार आहोत, जी कॉंग्रेसची पद्धत होती. कॉंग्रेसची पद्धत अशीच आहे. कोणी रुसला-रागवला की हा सरचिटणीस, तो उप-सरचिटणीस, तो उपाध्यक्ष. शिवसेनेचं तसं नव्हतं. शिवसेनेचा एक प्रमुख हा जिल्हा परिषदेच्या गटा प्रमुखाप्रमाणे असायचा. एक उपविभाग प्रमुख पंचायतसमिती गणाप्रमाणे असायचा. जेणे करून त्याचं कार्यक्षेत्र हे ठरलेलं असतं. काहीही झालं तरी ते त्यासाठी उत्तर देण्यासाठी बांधील असतो. आपल्या कार्यक्षेत्रात रिझल्ट आणणं त्याच्यावर बंधन कारक असतं. आता एकाच कार्यक्षेत्रात 10 पदाधिकारी नेमले तर कोणाची जबाबदारी कोणावर द्यायची. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये ज्या प्रमाणे फक्त खूश करण्यासाठी पद दिलं जातं होतं, तसं शिवसेनेत दिलं जाऊ नये हा माझा आग्रह त्या भांडणात होता आणि आजही आहे.’
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.