
Pune Crime : लग्नानंतर पती पत्नीमध्ये प्रेमासोबत कुठल्या ना कुठल्या कारणावरुन वादही होतात. पण काही संसारात वाद इतके टोकाला जातात की, ते गुन्हेगारीकडे वळतात. पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीकडे शरीर संबंध ठेवण्यासाठी इच्छा व्यक्त ते योग्य. पण जर हीच इच्छा पत्नीने पतीकडे व्यक्ती केल्यास तो गुन्हा असतो का? तर पुण्यात एका विवाहित महिलेने पतीविरोधात येरवडा पोलिसांकडे गंभीर आरोप केला आहे. तिने तक्रारीत सांगितलं की, तिने पतीकडे शरीर संबंधाची इच्छा व्यक्त केली तर पतीने तिच्या गुप्तांगावर आणि मांडीवर सिगारेटने चटके दिले. या प्रकरणात पोलिसांनी पतीसोबत सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
वैवाहित महिलेने पोलिसांना काय सांगितले?
या महिलेचं लग्न मुस्लिम पद्धतीने 11 एप्रिल 2025 ला येरवड्यामधील आरोपीशी झाले होते. तिने पोलिसांना सांगितलं की, लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिचा पती विचित्र वागत होता. तो पहिल्याच रात्री तिला आपण खूप थकलो आहोत असं म्हणून झोपून गेला. पुढील काही दिवस पत्नीने वाट पाहिली. पण शरीर संबंध ठेवण्यासाठी तो टाळाटाळ करत होता.
त्यानंतर पत्नीनेच पुढाकार घेत सौम्यपणे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पण पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे तिच्या लक्षात आलं. त्यावर तिने वैद्यकीट उपचार करण्याचा सल्ला दिला. पण पतीने आपण आधीच डॉक्टरांना दाखवलं असून मला काही प्रॉब्लेम नसल्याचे सांगितलं. त्यानंतर पत्नी जेव्हा जेव्हा जवळ जायची पती घराबाहेर जाऊन झोपत होता. लग्नानंतर दोन महिने हा प्रकार सुरु होता.
त्यानंतर महिलेने पतीच्या विचित्र वागण्याबद्दल सासरच्या लोकांना सांगितलं. तर त्यांनी मदत करण्याऐवजी ही गोष्ट बाहेर कुणाला सांगितली तर..अशी धमक्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर तिचा जास्त प्रमाणात मानसिक छळ होत होता. तिने माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली तर लग्न झालंय तर आता निभावून ने, अशी सक्ती केली.
एक दिवशी पत्नीने शरीर संबंधाची इच्छा व्यक्ती केली तर पती संतापला. त्यानंतर चल तुला दाखवतो म्हणत बेडरूममध्ये घेऊन गेला. खोलीच्या आत नेल्यावर तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि मांडीवर सिगारेटचे चटके दिले. या क्रूरतेनंतरही सासरच्या लोकांकडून छळ सुरु होता. पीडित महिलेने माहेरी जायचा प्रयत्न केल्यावर नणंदांनी तिला जबरी रोखलं.
अत्याचाराची परिसीमा म्हणजे हे सगळं इथेच नाही थांबल त्यानंतर पतीने कहर केला. तिच्या चुलत सासऱ्यांना तो पत्नीकडे पाठवत होता. त्यांची वाईट नजर पाहून तिने चुलत सासऱ्यांना घरात घेण्यास नकार दिला. त्यानंतर पतीकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. त्यानंतर तणावाला कंटाळून आपण आत्महत्या करु असं सांगितल्यावर दोन्ही कुटुंबाने बैठक घेतली. या बैठकीत पतीने कबुल केलं की, तो शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही.
सध्या पीडिता माहेरी राहते असून पतीने जाणूनबुजून विवाह करून तिला मानसिक-शारीरिक त्रास दिला अशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीत तिने सांगितलं की सिगारेटचे चटके देत अत्याचार केला. या प्रकरणात पोलिसांनी पती, सासू, नणंद, चुलत नणंद आणि चुलत सासरे अशा एकूण पाच जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



