digital products downloads

परभणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर; काँग्रेसचे देशमुख ठरले उपमहापौर

परभणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर; काँग्रेसचे देशमुख ठरले उपमहापौर

Shivsena Muslim Mayor in Parbhani: परभणी महापालिकेवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता आली आहे. परभणी पालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसला असून, काँग्रेसचा उपमहापौर विराजमान झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौरपदी विजयी झाले आहेत. तर काँग्रेसच्या गणेश देशमुखांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिम महापौर केल्याने आता महायुतीकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर

शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर झाले असून, त्यांना 39 मतं मिळाली. यामधील शिवसेनेचे 25, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 1 अशी एकूण 39 मतं मिळाली. भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मतं मिळाली. काँग्रेसचे गणेश देशमुख यांचा उपमहापौरपदी विजय झाला आहे. गणेश देशमुख यांना 37 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाझीमा अब्दुल रहीम यांना 27 मतं मिळाली आहेत.

संदय राऊतांनी केली पाठराखण

संजय राऊतांना मुस्लिम महापौर करण्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी यामध्ये गैर काय? अशी विचारणा केली आहे. या देशात मुस्लिम राष्ट्रपती होतात. मुख्यमंत्री, राज्यपाल, लष्करप्रमुखही मुस्लिम होतात तर महापौर होण्यात गैर काय? अशी विचारणा केली आहे.

शिवसेनेकडून दिलीप ठाकूर, श्याम खोबे,  सय्यद समी उर्फ माजूलाला, सय्यद इकबाल सय्यद ख्वाजा,शरफुद्दीन सिद्दिकी, अर्जुन सामाले या सहा जणांनी अर्ज दाखल केला होता. तर काँग्रेसकडून भगवान वाघमारे, गणेश देशमुख आणि गुलमीर खान यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले होते. भाजपकडून मीनाताई सुरेश वरपूडकर, डॉ केदार खटिंग, तिरूमला खिल्लारे आणि रितेश झांबड या चार जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp