digital products downloads

पहलगाम अतिरेकी हल्ला: 35 वर्षांत प्रथमच जम्मू-काश्मिरात ऐतिहासिक बंद

पहलगाम अतिरेकी हल्ला:  35 वर्षांत प्रथमच जम्मू-काश्मिरात ऐतिहासिक बंद

  • Marathi News
  • National
  • Pahalgam Terrorist Attack; Historic Shutdown In Jammu And Kashmir For The First Time In 35 Years

मुदस्सीर कुलू|पहलगाम2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पहलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यांत २६ पर्यटकांच्या निर्घृण हत्येच्या िवरोधात बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये ऐतिहासिक बंद पाळण्यात आला. ३५ वर्षंात पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद पाहायला मिळाला. यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. संवेदनशील भागात निमलष्करी दल तैनात केले आहे. पीडीपी नेते वहीद पारा आणि मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडियावर लोकांना या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स काॅन्फरन्स, अपनी पार्टीसह अनेक पक्ष व संघटनांनी बंदचे समर्थन केले.

दुसरीकडे, गुजरातचे ६० वर्षीय पर्यटक विनय भाई यांची ही मनोभावना आहे. विनय २० जणांसोबत आले होते. दुपारचे जेवण एका स्थानिक रेस्तराँमध्ये घेतल्यानंतर ३ किमी चढाई करून बॅसरनला पोहाेचले होते. अनंतनागच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल विनय म्हणाले, आम्ही बॅसरनचे एंट्री तिकीट खरेदी केले, तसा गोळ्यांचा आवाज सुरू झाला. लोक किंकाळत पळू लागले. मला एक गोळी कोपऱ्याला लागली. मी कोसळलो. मी १० मिनिटे जमिनीवर पडून राहिलो. स्थानिक टट्टूवालाने रुग्णालयात नेले.तामिळनाडूचे डॉ. परमेश वर्मांना पोट, हात व गळ्यात गोळ्या लागल्या. त्यांना रुग्णालयात घेऊन आलेली पत्नी म्हणाली, हा हल्ला नाही, कत्तल होती.

काश्मीरमधील ८०%, गुलमर्गमधील ७०% बुकिंग पर्यटकांनी केले रद्द

दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी काश्मीरमध्ये पर्यटकांची गर्दी होती. दऱ्याखोऱ्यांमध्ये आनंद होता. हॉटेल्स भरलेली होती आणि पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्गसारख्या ठिकाणी ८०% पर्यंत बुकिंग होती. या हल्ल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. आता काश्मीरमध्ये ८०% बुकिंग, गुलमर्ग-सोनमर्गमध्ये ७०% बुकिंग रद्द करण्यात आली आहे. दोन हॉटेल चालवणारे उमर अहमद म्हणाले की, माझ्याकडे ४० खोल्या आहेत, जूनपर्यंत १००% बुकिंग होते. आता सर्वांनी ते रद्द केले. पहलगाममध्ये १३० हॉटेल्समध्ये ३ हजार खोल्या आहेत. पण बुधवारी तिथे फक्त सुरक्षा कर्मचारी आणि हॉटेल मालक दिसले. बुधवारी श्रीनगर विमानतळावर ३०० पर्यटक आले, तर सामान्य दिवशी येथे रोज ४,००० पर्यटक येतात. दल सरोवराजवळ फक्त काही पर्यटक दिसले. संध्याकाळी सहसा गजबजलेला लाल चौक मात्र निर्जन पडून होता.

पहलगाम अतिरेकी हल्ला: 35 वर्षांत प्रथमच जम्मू-काश्मिरात ऐतिहासिक बंद

टीआरएफ: जयपूरचे कर्नल आशू यांचे नाव घेताच थरथर कापायचे दहशतवादी

काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या दहशतवाद्यांनी २ मे २०२० रोजी जयपूरचे कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह ५ जणांची हत्या केली होती. कर्नल आशुतोष यांचे मोठे भाऊ पीयूष शर्मा म्हणतात – माझ्या भावाच्या नावाने थरथर कापणाऱ्या टीआरएफने पुन्हा डोके वर काढले आहे. दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये ९० च्या दशकातील परिस्थिती पुन्हा स्थापित करायची आहे. त्यांची मुळे उपटून टाकणे आवश्यक आहे.

पीयूष म्हणतात- माझा भाऊ २१ राष्ट्रीय रायफल्सचा कमांडिंग ऑफिसर होता, जो काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवायांचे नेतृत्व करत होता. दहशतवादविरोधी कारवाया आणि गनिमी कावा प्रणालींमध्ये तो तज्ज्ञ होता. या बटालियनने दहशतवाद्यांचे विद्यापीठ ओळखल्या जाणाऱ्या लोलाब-राजवार परिसराला दहशतवाद मुक्त केले होते. म्हणूनच या बटालियनला राजवार टायगर्स म्हणतात. या बटालियनने २० वर्षांत ३०० दहशतवाद्यांना ठार मारले, त्यापैकी १३ एकट्या आशुतोषने मारले. म्हणूनच सर्व सैनिक त्याला ‘राजवर टायगर’ म्हणत.

मास्टरमाइंड:सैफुल्लाहने २०२६ पर्यंत काश्मीर ताब्यात घेण्याची घेतली शपथ

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) घेतली आहे. हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह खालिद किंवा सैफुल्लाह कसुरी आहे. तो तोयबाचा उपप्रमुख असून २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदसोबत त्याचे घनिष्ठ संबंध आहेत. तो जमात-उद-दावासाठी समन्वयाचे काम करत होता. सैफुल्लाह खालिद पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची राजकीय शाखा मिल्ली मुस्लिम लीगचा प्रमुख आहे. तो पीओकेतून भारतविरोधी दहशतवादी मोहिमांत सामील आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर सैफुल्लाहने पाकिस्तान सरकारच्या धोरणावर टीका केली होती. २०१९ मध्ये सैफुल्लाहने एका व्हिडिओत काश्मीर मुद्द्याला ‘जिवंत’ ठेवण्याची घाेषणा केली आहे. २०२५ च्या बैठकीत सैफुल्लाहने घोषणा केली होती की, २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. त्याने उघडपणे सांगितले की, आगामी काळात मुजाहिदीन हल्ले तीव्र करतील.ऑगस्ट २०२४ मध्ये त्याने कतारमध्ये हमासशी चर्चा केली.

दौरा… पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मूंचा दौरा रद्द

अतिरेकी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारचे कार्यक्रम रद्द केले आहेत. ते कानपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्‌घाटन करणार होते. यासोबत माेदी कानपूरमध्ये २० हजार कोटींच्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आसाम दौरा स्थगित केला आहे. त्या दोनदिवसीय दौऱ्यावर गुवाहाटी विद्यापीठाच्या ३२ व्या पदवीप्रदान सोहळ्यात सहभागी होण्यासोबत अनेक अन्य कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमणही अमेरिकेचा दौरा सोडून परतल्या आहेत.

मशिदी अन् गुरुद्वारांचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडले, लंगर सुरू

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी सामान्य काश्मिरी लोक समोर येत आहेत. ते रस्त्यांवर भोजन, पाण्यासोबत आपल्या घरी आश्रय देत आहेत. श्रीनगरमध्ये गुरुद्वारा समितीने लंगर सेवा सुरू केली आहे. त्यांनी आवाहन केले की, तुम्ही काश्मीरच्या कोणत्याही भागात अडकला असाल तर जवळच्या गुरुद्वाराशी संपर्क साधावा. पहलगाम, अनंतनाग, श्रीनगर, गुलमर्ग, बारामुल्लातील सर्व भागांत खोल्या आणि लंगरच्या सुविधांचे गुरुद्वारे आहेत.

कापड व्यावसायिक नजाकतने छत्तीसगडच्या ११ लोकांना वाचवले

पहलगाम हल्ल्यात छत्तीसगडच्या चिरमिरच्या ४ कुटुंबातील ११ लोक अडकले. त्यात ३ मुलेही होते. २१ एप्रिल रोजी पहलगाम पाेहोचले होते. यात शिवांश जैन, हॅपी वधावन, अरविंद अग्रवाल आणि कुलदीपचा समावेश आहे. हल्ल्यावेळी सर्व लोक पहलगाममध्ये होते. शिवांश जैन म्हणाले, भूस्खलनामुळे रस्ते जाम झाले हाेते. तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाला. लोक सैरावैरा पळू लागले. यादरम्यान स्थानिक काश्मिरी व्यापारी नजाकत अलींच्या मदतीने सर्व घटनास्थळावरून सुरक्षित बाहेर पडले. नजाकत अली हिवाळ्यात चिरमिरमध्ये उबदार कपडे विकतात. पहलगाम पोहोचल्यावर त्यांच्याशी संपर्क केला होता. सर्व त्यांच्यासोबत फिरायला गेले होते. त्यांनी आम्हाला वाचवले.

टॅक्सी ड्रायव्हरने हल्ल्यानंतर आश्रय देऊन प्राण वाचवले

महाराष्ट्रातून पहलगाम फिरायला आलेल्या एका कुटुंबाने व्हिडिओ जारी करून सांगितले की, अतिरेकी हल्ल्यानंतर काश्मिरी टॅक्सी ड्रायव्हर आदिलने (काळ्या जॅकेटमधील) त्यांना हल्ल्यानंतर आश्रय दिला. यामुळे त्यांच्या कुटुंबाचे प्राण वाचले. आदिलने जेवू घातले. या व्हिडिओत आदिल म्हणतो, पहलगाम हल्ला माणुसकीची हत्या आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीर बदनाम झाले. आमचा व्यवसाय गेला. पूर्ण मानुसकी शरमेने बुडाली आहे. चूक अतिरेक्यांनी केली, शिक्षा पूर्ण काश्मीर भोगेल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp