
पहलगाम दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack News in Marathi): जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा जवान सतर्क झाले असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विशेष विमानाने घटनास्थळी रवाना झाले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान या हल्ल्यात महाराष्ट्राच्या पुण्यातील कुटुंब जखमी झालं आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
पुण्यातील पाच जणांच कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेलं होतं. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. असावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे आणि संगीता गाबोटे अशी त्यांची ओळख पटली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पेहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मिरी पोषाख घालुन फोटो काढत होतं. त्यावेळी अचानक समोर दहशतवादी आले. दहशतवाद्यांनी या पर्यटकांना नावे विचारली. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.
Strongly condemn the unfortunate terrorist attack on tourists in #Pahalgam, Jammu & Kashmir. Heartfelt condolences to the families who have lost their loved ones. Wishing a speedy recovery to the injured.
पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. जखमींमध्ये महाराष्ट्रातील काही…
— Supriya Sule (@supriya_sule) April 22, 2025
पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असुन या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे. या कुटुंबासह पुण्यातील आणखी काही पर्यटक देखील या हल्ल्यात जखमी झालेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
दोघांचा मृत्यू झाल्याची फडणवीसांची माहिती
“पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी जीव गमावला त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना माझी मनापासून श्रद्धांजली. आम्ही शोकाकुल कुटुंबांसोबत दृढ आहोत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. आम्ही जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत,” अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
I strongly condemn the cowardly terrorist attack in Pahalgam. My heartfelt tributes to the ones who lost lives. My deepest condolences to the families who lost their loved ones. We stand strongly with the bereaved families. Praying for speedy recovery of the injured ones.
We are…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 22, 2025
काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदारी यांच्याशी फोन करून चर्चा केली आणि सविस्तर माहिती घेतली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील दिलीप दिसले आणि अतुल मोने हे 2 पर्यटक यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एक पनवेल येथील माणिक पटेल आणि दुसरा एस. भालचंद्र राव आहे. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे असंही ते म्हणाले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.