digital products downloads

पहिले अजित पवारांच्या बारामतीत, भारतातील दुसरे मोठे AI डेटा सेंटर कुठे उभारणार? 9100000000000 रुपयांची महागुंतवणूक!

पहिले अजित पवारांच्या बारामतीत, भारतातील दुसरे मोठे AI डेटा सेंटर कुठे उभारणार? 9100000000000 रुपयांची महागुंतवणूक!

Adani Group Will Invest 100 Billion Dollar To Build Data Centers :  आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा महाकुंभ अर्थात “एआय इम्पॅक्ट समिट 2026” चा शुभारंभ झाला आहे. जगभरातील IT आणि टेक कंपन्यांचे दिग्गज यात सहभागी झाले आहेत. जगभरात AI क्रांती झाली आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये AI चा वापर वाढला आहे. अशातच  भारतातील दुसरे मोठे AI डेटा सेंटर पुण्यात उभारले जाणार आहे. या डेटा सेंटरसाठी 9100000000000 रुपयांची महागुंतवणूक केली जाणार आहे. भारतातील पहिले AI डेटा सेंटर पुण्यातच आहे.  अजित पवार यांच्या बारामतीत हे डेटा सेंटर आहे. 

Add Zee News as a Preferred Source

28 डिसेंबर 2025 रोजी बारामतीत उभारले पहिले सेंटर

बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक एआय सेंटरचे 28 डिसेंबर 2025 रोजी उद्घाटन झाले. बारामतीत शरद पवार , अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे गौतम अदानींसोबत एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. बारामतीत शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंसचं उद्योगपती गौतम अदानी यांनी उदघाटन केले. आमदार रोहित पवार यांनी यावेळी अदानी यांच्या कारचे सारथ्य केले. अजित पवारांनी यावेळी बारामतीच्या शैक्षणिक हबची माहिती दिली होती. 

अदानी समूहाने भारतात मोठे AI डेटा सेंटर आणि AI सिटी उभारण्याची घोषणा केली आहे.   जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा-संगणक प्रकल्पात  अदानी समूहाने 9.1 लाख कोटी रुपयांच्या थेट गुंतवणूकीची घोषणा केली आहे. 2035 पर्यंत भारतात डेटा सेंटर्स उभारण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. या डेटा सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे हे डेटा सेंटर अक्षय ऊर्जेवर चालतील. एआय तंत्रज्ञानाने सज्ज असतील.

भारताला एआय क्रांतीची प्रमुख शक्ती केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. देशाला ऊर्जा आणि संगणनात स्वावलंबी बनण्यासाठी हे सेंटर मह्तवपूर्ण भूमिका बजावणार आहे. 100 अब्ज डॉलर्सच्या या गुंतवणुकीमुळे 2035 पर्यंत सर्व्हर उत्पादन, वीज पायाभूत सुविधा, स्वतःच्या क्लाउड प्लॅटफॉर्मचा विकास आणि इतर संबंधित उद्योगांमध्ये अंदाजे 150 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे.

250 अब्ज डॉलर्सची एआय पायाभूत सुविधा

पुढील दहा वर्षांत, भारतात 20.8 लाख कोटींच्या  एआय पायाभूत सुविधांची परिसंस्था असतील. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी या प्रोजेक्टची घोषणा केली. जगात AI क्रांती होत आहे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतात लक्षवेधी AI क्रांती घडवून आणण्याचे उद्दीष्ट आहे. अदानी समूह त्यांच्या विद्यमान डेटा सेंटर आणि ग्रीन एनर्जी अनुभवाचा वापर करून संपूर्ण पाच-स्तरीय एआय स्टॅकमध्ये विस्तार करत आहे. भारताचे तांत्रिक सार्वभौमत्व मजबूत करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे अदानीकनेक्सचे सध्या कार्यरत असलेले 2 गिगावॅट (GW) राष्ट्रीय डेटा सेंटर 5 गिगावॅट (GW) पर्यंत वाढेल, ज्यामुळे भारत जागतिक एआय अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येईल.

‘या’ शहरांमध्ये एआय कॅम्पस उभारणार

भारतात AI सिटी उभारण्यासाठी गुगलसोबत एक मोठी भागीदारी करण्यात आली आहे. यामुळे विशाखापट्टणममध्ये देशातील सर्वात मोठे गिगावॅट-स्केल एआय डेटा सेंटर कॅम्पस उभारले जाणार आहे. नोएडामध्येही असेच कॅम्पस स्थापन केले जातील. हैदराबाद आणि पुण्यात मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने डेटा सेंटर उभारले जाणार आहेत.
अदानी समूह भारतात मोठ्या प्रमाणात AI कॅम्पस निर्माण करण्याचा विचार करणाऱ्या इतर प्रमुख कंपन्यांशीही चर्चा करत आहे. यामुळे भारतातील आघाडीचे एआय इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर म्हणून त्यांचे स्थान आणखी मजबूत होणार आहे. अदानी समूह फ्लिपकार्टसोबतची डेटा सेंटर भागीदारी आणखी मजबूत करणार आहे. ही भागीदारी फ्लिपकार्टच्या पुढील पिढीतील डिजिटल कॉमर्स, उच्च-कार्यक्षमता संगणन आणि मोठ्या प्रमाणात एआय वर्कलोड्सना समर्थन देण्यासाठी दुसऱ्या एआय डेटा सेंटरच्या विकासाला समर्थन देणार आहे. 5 गिगावॅट (GW) क्षमता जगातील सर्वात मोठी एकात्मिक डेटा सेंटर प्लॅटफॉर्म तयार करेल, ज्यामध्ये अक्षय ऊर्जा निर्मिती , ट्रान्समिशन पायाभूत सुविधा आणि हायपरस्केल एआय कंप्यूट एकाच समन्वित आर्किटेक्चरमध्ये एकत्रित केले जाईल. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp