
Jalna Bogus Voting: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणाहून मतदार याद्यांमधील घोळ, पैसे वाटप, बोगस मतदान असे प्रकारदेखील समोर येत आहेत. जालन्यामध्ये बोगस मतदानाचा एक प्रकार समोर आला. पुण्याहून आलेल्या मतदाराला त्याच्या नावे आधीच मतदान झाल्याचे कळाले. यानंतर तो निराश झाला. पुढे काय झालं? सविस्तर जाणून घेऊया.
आनंद शिंदे नावाच्या तरुणाने पहिल्यांदाच मतदान करायचं ठरवलं. पुण्याहून तो जालन्यातील आपल्या गावी अंबड येथे आला. प्रभाग क्रमांक 1 मधील बूथ क्रमांक 3 वर गेल्यावर त्याला धक्का बसला. त्याच्या नावावर आधीच दुसऱ्याने मतदान केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. म्हणजेच बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला.
निराश होऊन परत फिरला आणि…
मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी आनंदची तक्रार फारशी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे दूरवरून आल्यावरही मतदान न झाल्याने तो खूप नाराज आणि संतापला. काहीही न बोलता तो आल्या पावली पुन्हा पुण्याला परत निघून गेला.
तातडीने हालचाल
आनंदच्या तक्रारीची बातमी व्हायरल झाली. यानंतर निवडणूक विभाग खडबडून जागा झाला. बोगस मतदानाचा आरोप गंभीर असल्याने त्याची चौकशी सुरू झाली. तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्वतः या प्रकरणाकडे लक्ष दिलं.
पुन्हा मतदानाची खास संधी
निवडणूक नियमांनुसार जर एखाद्या मतदाराच्या नावावर बोगस मतदान झाल्याचं सिद्ध झालं तर त्याला ‘टेंडर्ड व्होट’ म्हणजेच प्रदत्त मतदान करण्याची संधी दिली जाते. त्याच नियमाचा आधार घेऊन आनंद शिंदेला पुन्हा मतदान केंद्रावर बोलावलं गेलं आणि त्याने यशस्वीरीत्या आपलं मत टाकलं.
काय म्हणाले तहसीलदार?
अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ‘आनंद शिंदे याला पुन्हा मतदानाची संधी देण्यात आली आणि त्याने आपलं मत यशस्वीपणे टाकलंय’, असे ते म्हणाले. आता या बोगस मतदान प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. लोकशाहीत मतदानाचा हक्क कुणालाही हिरावला जाणार नाही, हे या घटनेने पुन्हा सिद्ध झाले.
FAQ
१. आनंद शिंदे यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
उत्तर: आनंद शिंदे हे पुण्याहून पहिल्यांदा मतदान करायला अंबड (जालना) येथे आले. प्रभाग क्र. १, बूथ क्र. ३ वर गेले असता त्यांच्या नावावर आधीच दुसऱ्याने बोगस मतदान केल्याचं समजलं. अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने ते नाराज होऊन परत फिरले.
२. बोगस मतदान झाल्यास मतदाराचं काय होतं? कायदा काय सांगतो?
उत्तर: जर एखाद्या मतदाराच्या नावावर दुसऱ्याने बोगस मतदान केलं तर त्या मतदाराला “टेंडर्ड व्होट” (प्रदत्त मतदान) करण्याची संधी दिली जाते. हा मतदार पुन्हा येऊन आपलं मत विशेष कागदावर टाकू शकतो. नंतर चौकशीत ते मत मोजलं जातं आणि बोगस मत रद्द होतं.
३. शेवटी आनंद शिंदे यांनी मतदान केलं का?
उत्तर: हो! तक्रार व्हायरल झाल्यानंतर निवडणूक विभागाने तातडीने कारवाई केली. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद शिंदे यांना पुन्हा बूथवर बोलावून टेंडर्ड व्होट देण्यात आलं आणि त्यांनी यशस्वीरित्या मतदान केलं.असा प्रकार दुर्मीळ असला तरी निवडणूक विभागाने त्वरित दखल घेऊन मतदाराचा हक्क वाचवला, ही चांगली बाब आहे!
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



