
पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. या दोन्ही पालख्यांचे या वर्षीचे वेळापत्रक समोर आले असून, संत तुकाराम महार
.
आषाढी एकादशीची चाहूल लागताच महाराष्ट्रभरातून हजारो दिंड्या आणि लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. यंदाची आषाढी एकादशी 6 जुलै 2025 रोजी असून, विठुनामाच्या गजरात हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने पायी वारीला निघाले आहेत. शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीने आधीच प्रस्थान केले असून, आता संत ज्ञानेश्वर अन् तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पायी सोहळा वेळापत्रक
- 19 जून : माऊली पालखी प्रस्थान आळंदी ( प्रस्थान गुरुवारी आल्यामुळे संध्याकाळी आठ वाजता प्रस्थान होणार )
- 20 जून : आळंदी ते पुणे,
- 21 जून : पुणे मुक्काम
- 22 जून : पुणे ते सासवड,( दिवेघाट वारकरी खेळ )
- 23 जून : सासवड मुक्काम
- 24 जून : सासवड ते जेजुरी, ( भंडाऱ्याची उधळण )
- 25 जून : जेजुरी ते वाल्हे, (जेजुरी खंडोबा दर्शन )
- 26 जून : वाल्हे ते लोणंद,(माऊलींना निरास्मान व सातारा जिल्हा प्रवेश)
- 27 जून : लोणंद ते तरडगाव
- 28 जून : तरडगाव ते फलटण
- 29 जून : फलटण ते बरड
- 30 जून : बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश व बरड येथे गोल रिंगण)
- 01 जुलै : नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण)
- 02 जुलै : माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोळ रिंगण)
- 03 जुलै : वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा)
- 04 जुलै : भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
- 05 जुलै : वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
- वाखरी येथे गोल रिंगण
- 06 जुलै : देवशयनी आषाढी एकादशी
- 10 जुलै : पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
संत तुकाराम महाराज पायी सोहळा वेळापत्रक 2025
- 18 जून : प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम
- 19 जून : देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
- 20 जून : आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
- 21 जून : निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
- 22 जून : पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
- 23 जून : लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
- 24 जून : यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
- 25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
- 26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
- 27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
- 28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
- (बेलवडी येथे पहिले गोल रिंगण)
- 29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
- (इंदापूर येथे गोल रिंगण )
- 30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
- 1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
- 2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
- (माळीनगर येथे उभे रिंगण )
- 3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
- 4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
- (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण )
- 5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम
- (वाखरी येथे उभे रिंगण )
- 6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
- 10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.