digital products downloads

पाणी फाऊंडेशनचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार होणार: गटशेतीसाठी नवे धोरण आणि वाढीव आर्थिक मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा – Pune News

पाणी फाऊंडेशनचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार होणार:  गटशेतीसाठी नवे धोरण आणि वाढीव आर्थिक मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा – Pune News

राज्य शासनाच्या वतीने 2016 सालापासून वीस शेतकरी व 100 एकर जमीन असेल तर गटशेतीला आतापर्यंत एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. आता राज्य सरकार गटशेतीचे नवे धोरण आणणार असून आर्थिक मदत वाढवू. त्यातून गटशेतीला आपण आंदोलनाचे स्वरूप देऊ, अशी महत्त्वा

.

बालेवाडी येथील शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात येथे पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२४’च्या भव्य पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमिर खान आणि किरण राव यांनी स्थापन केलेली ही संस्था २०१६ पासून दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचे काम करत आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विलास शिंदे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह आमीर खान, किरण राव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सर्व सहभागी शेतकरी गटांचे कौतुक केले. तसेच त्यांनी त्यांच्या एकतेचे कौतुक केले आणि शेतीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चितता आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतीतील सामूहिकीकरण कसे महत्त्वाचे आहे यावर भर दिला.

यंदाच्या शेतकरी चषक स्पर्धेत महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांतील ४,३०० पेक्षा अधिक शेतकरी गटांनी (सुमारे २००० महिला गट) भाग घेतला. यात सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तेरती या गावातील ‘भाग्योदय शेतकरी गट’ संघाने राज्य पातळीवरील प्रथम पारितोषिक पटकावत २५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, तसेच प्रतिष्ठेची शेतकरी चषक ट्रॉफी जिंकली. सातारा जिल्ह्यातील भोसरे (ता. खटाव) येथील सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोबलगाव (ता. खुलताबाद) या दोन संघांना संयुक्तरीत्या १५ लाख रुपयांचे राज् पातळीवरील द्वितीय पारितोषिक देण्यात आले. तर हिंगोली जिल्ह्यातील कवडा (ता. कळमनुरी) येथील जय बिरसा मुंडा शेतकरी गट आणि वाशिम जिल्ह्यातील नागी (ता. मंगरूळ पीर) येथील माऊली शेतकरी गटाने संयुक्तरीत्या १० लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक जिंकले.सर्व महिला गटांना दोन राज्यस्तरीय पारितोषिके आणि तालुकास्तरीय प्रत्येकी ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणी फाऊंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अखिल महाराष्ट्र स्पर्धेचे अधिकृतरीत्या उद्घाटन केले. शाश्वत पाणी व शेती पद्धतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.मी आधीपासून आमीर खान यांना सांगत होतो तुमची क्षमता संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज माझी इच्छा पूरी केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पाणी फाऊंडेशनचा जलसंधारणाचा विचार सर्वत्र झपाट्याने पसरला पाहिजे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp