
पातूर तालुक्यातील चरणगाव येथील ग्रामस्थ मूलभूत सुविधांवरुन शुक्रवारी आक्रमक झाले. पावसाचे पाणी घरात शिरत असून, अन्य विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आराेप करीत ग्रामस्थांनी पंचायत समितीमध्ये धाव घेतली. महिलांनी गावातील प्रश्नांबाबत जाब विचार विस्
.
१५व्या वित्त आयोगाच्या निधीत चरणगाव ग्रामपंचायमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार काही सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली हाेती. ई-निविदा प्रक्रिया न करता सभेची मंजुरी किंवा जमा-खर्च न देता १४ लाख ६५ हजार ५०० रुपये अनधिकृतरित्या काढल्याचा आरोप तक्रारीत केला हाेता. निधीतून साहित्य खरेदी झाले नसून, विकास कामेही करण्यात आली नाहीत, असेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे हाेते. याप्रकरणी प्रशासकीय व फौजदारी कार्यवाही व्हावी, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान गावात पाणी शिरल्याने उपाय याेजना करण्यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी २९ ऑगस्ट राेजी पंचायत समितीमध्ये धाव घेतली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश हाेता. महिलांनी आपल्या मागण्या लावून धरत अनियमिततेप्रकरणी कार्यवाही मागणी केली. मात्र याठिकाणी वाद झाला. त्यानंतर कार्यवाहीसाठी ग्रामस्थ, लाेकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेत धाव घेत ठिय्या आंदाेलन केले. आंदाेलनात माजी जि.प. सदस्य विनोद देशमुख, मुरलीधर क्षीरसागर, वैशाली दिपक इंगळे, समाधान आवटे, रमेश बघे, संतोष सुलताने, गणेश देशमुख, पंजाब देशमुख, दिनकर ढोकणे, पुंजाजी वायकर, सुदर्शन गाडेकर, धनंजय गाडेकर, दिपक शिंदे, रतन बावणे, वंदना शेळके, चांडाबाई वायकर, वासुदेव उगले, बबन आवटे, दिलीप ढोकणे, राजू देशमुख, दिपक इंगळे, सुनील देशमुख, धनंजय देशमुख, सुशांत देशमुख,श्रीकृष्ण इंगळे आदी सहभागी झाले.
मला शिविगाळ केली-विस्तार अधिकारी
काही महिलांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. काहींनी बाेलताना अपशब्दांचा वापर केला. संसदीय भाषा वापरली. मला शिविगाळ करत मारहाण केली. त्यामुळे मीही प्रतिकार म्हणून थापड मारली.- दिनकर घुगे, विस्तार अधिकारी, पातूर.
काय आहे निवेदनात
सरपंच हे अपात्र असून, उपसरपंचांकडे प्रभार हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले. रिक्त पदांचाही अहवालही अधिकाऱ्यांनी दिला नाही. वाॅर्ड क्रमांक २ मध्ये सखल भाग असल्याने ग्रामस्थांचे अताेनात हाल झाले. प्रत्येक वेळी पाऊस झाल्यास घरांमध्ये पाणी शिरते. मात्र यावर उपाय याेजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सात दिवसात अहवाल सादर करा
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पातूर गट विकास अधिकाऱ्यांना सात दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. चरणगाव येथील ग्रमा सदस्य व अन्य ग्रामस्थांचे निवेदन, तक्रार प्राप्त झाली आहे. यात १५ व्या वित्त आयाेगाबाबत कामे न करता , साहित्य खरेदी न करता रक्कम काढणे, एकाच ग्रामसेवकाकडे ५ ते ६ गावांचा पदभार असून, पदभार कमी करणे नमूद आहे. त्यामुले तक्रारीनुसरा प्रातज्ञिक चाैकशी करून किंवा चाैकशी झाली असल्यास दाेषी असलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाविषयक कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करावा, असेही सीईओंनी आदेशात नमूद केले आहे. फाेटाे:- मागण्यासांठी चरणगाव येथील ग्रामस्थ व लाेकप्रतिनिधींनी जि.प.मध्ये ठिय्या आंदाेलन केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.