digital products downloads

‘पायलट सुसाईड बॉम्बर, कंपनीकडून डिसेंबरमध्ये 50 कोटींचा विमा आणि…’ अमोल मिटकरींचे गंभीर आरोप!

‘पायलट सुसाईड बॉम्बर, कंपनीकडून डिसेंबरमध्ये 50 कोटींचा विमा आणि…’ अमोल मिटकरींचे गंभीर आरोप!

Amol Mitkari on VSR Company: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा केवळ अपघात नसून कटकारस्थान असल्याची शंका व्यक्त केली. ते म्हणतात, अजितदादा इतके सामान्य नेते नव्हते की त्यांचा मृत्यू इतक्या सहजासहजी स्वीकारावा. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे. यासोबतच त्यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

‘पायलट सुसाईड बॉम्बर’

अजित पवारांची हत्या करण्यासाठी विमानात सुसाइड बॉम्बर बसवला गेला असावा. यावेळी त्यांनी राजीव गांधी हत्याकांड आणि मुंबईतील अजमल कसाब सारख्या घटनांची आठवण करून दिली. अशा पद्धतीने घातपात केला जाऊ शकतो. हा दावा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारा ठरलाय.

विमान आणि पायलटबाबत शंका

मिटकरी यांनी विमान कंपनीवर (VSR) गंभीर आरोप केले. हे विमान एक वर्षापासून तांत्रिक बिघाडामुळे बंदीमध्ये होतं, तरी अजित पवारांना दिलं गेलं. पायलट दोनदा बदलले गेले. शेवटच्या पायलटला मारुन 50 कोटी इतक्या मोठ्या विमा रकमेच्या आमिषासाठी प्रवृत्त केलं गेलं असावं, असा संशय त्यांनी व्यक्त केला. आपत्कालीन स्थितीत ‘मे-डे’ कॉल का आला नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

इतर संशयास्पद मुद्दे

अपघातानंतर कागदपत्रे जळाली नाहीत, पण मृतदेह जळाले. अजितदादांचं घड्याळ गायब झालं. विमानात 6 जण होते असं सांगितलं गेलं, पण फक्त 5 मृतदेह सापडले. मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज तातडीने जाहीर करावे, अशी मागणी मिटकरी करतात. ब्लॅक बॉक्स अहवाल येण्याआधीच हे पुरावे हवे, असं ते सांगतात.

नेमकं काय म्हणाले मिटकरी?

अजित पवारांचा घातपात आहे यावर मी ठाम आहे. विमान नादुरस्त होतं. एक वर्षापासून त्यावर बंदी होती. व्हीएसआर विमानाचा पायलट ऐनवेळी बदलण्यात आला. पहिल्या दिवशी रस्तेमार्गे पुण्याला जाणार होते. त्याची सीआयडी चौकशी सुरु आहे. व्हीएसआर कंपनीकडून पायलटचा 50 कोटींचा विमा काढला होता. VSR कंपनीने डिसेंबर 2025 च्या महिन्यात आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलट चा 50 कोटी रुपयाचा विमा उतरविला होती. कुटुंबाची काळजी करु नका आम्ही सर्व बघू, असे कंपनीकडून सांगण्यात आले का? हे तपासायला हवे. या कंपनीचे पायलट अजमल कसाबसारखे हिप्नोटाईज केले का हे तपासावे. व्हीएसआर कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही, असे मिटकरी म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp