digital products downloads

पार्थ पवारांच्या टीकेला काँग्रेसचे बोचरे प्रत्युत्तर: म्हटले – वडिलांच्या मृत्यूवर गप्प राहून शरणागती पत्करणाऱ्याने आमच्यावर बोलू नये – Mumbai News

पार्थ पवारांच्या टीकेला काँग्रेसचे बोचरे प्रत्युत्तर:  म्हटले – वडिलांच्या मृत्यूवर गप्प राहून शरणागती पत्करणाऱ्याने आमच्यावर बोलू नये – Mumbai News


बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, या महायुतीच्या प्रयत्नांना काँग्रेसने सुरुंग लावत आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. यावरून पार्थ पवार यांनी काँग्रे

.

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याने पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला होता. “काँग्रेसला कळायला हवे की ते काय करत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही, पण लोक हे विसरणार नाहीत. या निर्णयामुळे भविष्यात त्यांना महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल,” असा इशारा पार्थ पवारांनी दिला होता. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काँग्रेसने नेमके काय म्हटले?

पार्थ पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने त्यांच्या राजकीय परिपक्वतेवरच बोट ठेवले. “धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? ” अशा शब्दांत काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले.

सरेंडर झालेल्यांनी काँग्रेसबद्दल न बोललेले बरे

“स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील,” असा खोचक सल्ला काँग्रेसने पार्थ पवार यांना दिला.

आमच्या उमेदवाराच्या मागणीवर बोलायला हवे

या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे. असेही काँग्रेसने म्हटले आहे.

हे ही वाचा…

बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार:शरद पवार यांचे विधान, पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवरही भाष्य

“काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारीकीची शपथ घेतली. यानंतर दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बारामती पोटनिवडणूक, अशोक खरात प्रकरण, पार्थ पवार यांसह विविध मुद्द्यावर भाष्य केले. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial