digital products downloads

पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्यास भाजपाचा विरोध? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘NCP ने कोणाला…’

पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्यास भाजपाचा विरोध? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘NCP ने कोणाला…’

Devendra Fadnavis on Parth Pawar Rajya Sabha Nomination: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवणार असल्याची चर्चा असतानाच भाजपाने त्यांना विरोध केल्याचा दावा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा पार्थ पवार यांच्यासाठी अनुकूल नाही. पार्थ पवार यांच्याजागी त्यांची बंधू जय पवार यांच्या खासदार केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आता भाष्य करत, आपली बाजू मांडली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

‘भाजपाने कोणालाही विरोध केलेला नाही’

पार्थ पवार यांना भाजपाने विरोध करण्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, “भाजपाने कोणालाही विरोध केलेला नाही. भाजपाशी यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे. कोणाला पद द्यायचं, नामांकन द्यायचं, तिकिट द्यायचा याचे निर्णय ते घेतात. जेव्हापासून ते आमच्यासोबत आले तेव्हापासून कोणाला आमदार करायचं, खासदार, अध्यक्ष, सचिव मंत्री करायचे हे निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्या निर्णयात आमचं काही म्हणणं नाही”.

‘अजित पवारांनी मला विलिनीकरणासंदर्भात सांगितलं असतं’

“समजा अजित पवार साहेब जर विलीनीकरणसाठी चर्चा करत होते तर ते कोणतीही चर्चा भाजपाला न सांगता करतील का? चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपाला सांगितलं असतं. ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. चर्चा करायची, नाही करायची, विलिनीकरण करायचं यासंदर्भात सर्वस्वी 100 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. फक्त त्यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी इतकी अपेक्षा असेल. आणि ते करतात आणि पुढेही करतीत,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

‘मी अनेक गोष्टी सांगू शकतो’

पुढे त्यांनी म्हटलं की, “जर अजित पवार अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर NDA मधून बाहेर पडण्यासाठी करत होते का, ते काय सरकारमधून बाहेर पडणार होते का? सरकारमध्ये ते स्थिर होते. रोज काहीतरी गोंधळ निर्माण करायचा आणि मग आपली इको स्सिटम वापरुन ते कंफ्युजन इको करायचं ही पद्धत चूक आहे”. आम्हाला राजकारण करायचं नाही. अन्य़था मी अनेक गोष्टी सांगू शकतो असा इशाराही त्यांनी दिला. 

‘आदल्या दिवशी एक तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो’

“मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. माझे आणि अजित पवार यांचे इतके चांगले संबंध होते की त्यात ते सगळ्या गोष्टी शेअर करायचे. आदल्या दिवशी एक तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो,” असं ते म्हणाले. 

‘खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही’

“खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला आहे. शरद पवार आणि अजित पवारांचा असा पक्ष आहे. अजित पवारांच्या पक्षाने आमचं नेतृत्व सुनेत्राताईंनी करावं, शपथविधी करावा असं ठरवलं. हा त्यांचा सर्वस्वी निर्णय आहे. आमचे साथीदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. साथीदारांनी जो निर्णय घेतला त्याच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदार आहे,” असं ते म्हणाले. 

शपथविधी घाईत झाला याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस देईल. इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली तेव्हा अंत्यसंसंकराआधी राजीव गांधींना पंतप्रधान कऱण्याचा निर्णय घेतला होता. परिस्थिती नुसार निर्णय घेतला जात असतो. टीका करणारे हँडल्स पाहिल्यावर कोणत्या मानसिकतेतून होत आहे हे समजते असंही त्यांनी म्हटलं. 

अजित पवारांच्या दुर्घटनेवरुन उपस्थित होत असलेल्या संशयावर ते म्हणाले, “DGCA ची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स समोर आलेला आहे. दोन्ही पायलट एकमेकांशी काय बोलले याबाबतची पूर्ण माहिती ब्लॅक बॉक्स मध्ये स्टोअर असते. त्यामुळे त्याचा अभ्यास होणार”. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp