
पिशोर स्थानकात सकाळी बसची वाट पाहत थांबलेल्या महिला प्रवासी.
पिशोर ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान धावणारी बस सध्यापिशोर येथे थांबत नाही. ती थेटसहा किलोमीटरवर असलेल्यामेहगाव येथे मुक्कामी थांबते.त्यामुळे वेळापत्रक कोलमडलेआहे. बस कधी वेळेआधी, तरकधी उशिरा येते. यामुळे प्रवाशांनामोठा त्रास सहन करावा लागतआहे.
.
पूर्वी ही बस पिशोर येथेमुक्कामी थांबत होती. तेव्हा तीसकाळी सहा वाजून पाच-दहामिनिटांनी निघायची. दररोज तीसते पस्तीस प्रवासी या बसने ये-जाकरत होते. मात्र काही दिवसांपासूनही बस मेहगाव येथे मुक्कामी थांबू लागली.
वासडी येथे पोहोचताच बस प्रवाशांनी भरून जाते. त्यामुळेपिशोर येथील प्रवाशांना बसमध्येजागा मिळत नाही. वेळेचे पालनहोत नसल्याने शाळकरी विद्यार्थी, नोकरदार व व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. दैनिक दिव्य मराठीनेयापूर्वीही या समस्येवर प्रकाश टाकला. तरीही कन्नड व छत्रपती संभाजीनगर आगारप्रमुखांनी दुर्लक्ष केल्याने बसचे वेळापत्रकअजूनही बिघडलेलेच आहे.प्रवाशांनी ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.
काय म्हणतात ग्रामस्थ….?
निर्मलाबाई शिंदे ,निर्मलाबाई जाधव,ठगूबाईपंडीत गायकवाड,आनंदाबाई जाधव,पुष्पाबाई खडके यांनीसांगितले की, आम्हीसाडेपाच वाजेला पिशोरबसस्थानकात होतो. सहावाजले तरीही बस आलीनाही व नंतरच्या बस मध्येबसायला जागा मिळतनसल्याने बरेच प्रवासी घरीनिघून गेले.
आम्ही हतबल
गाडी मुक्कामीपाठवण्याविषयी अाम्हालामुख्य कार्यालयातून ज्यासुचना देतात त्याचे पालनकरावे लागते. याविषयी आम्ही हतबल आहोत.वरिष्ठस्तरावर तक्रारकरावी. -एन.डी. शहा, वाहतूकनिरीक्षक, छत्रपतीसंभाजीनगर
लवकरच समस्या साेडवू
याविषयी माझ्याकडेवारंवार तक्रारी प्राप्तझाल्या आहेत.गावातील शेतकरी,महिला व विद्यार्थ्यांनामाेठा त्रास आहे.यासंबंधितमहामंडळाला निवेदनदेऊन समस्य दुर करू.-पी.एम. डहाके, माजीसरपंच, पिशाेर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.