
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पीएच.डी. PET- २०२४ प्रक्रियेला तब्बल १८ महिने उलटूनही अद्याप विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल प्रवेशपत्र, कन्फर्मेशन लेटर व कोर्सवर्क शेड्यूल न मिळाल्याने संशोधकांमध्ये तीव्र नाराजी व च
.
निवेदनाच्या प्रती राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, यूजीसी अध्यक्ष, केंद्रीय शिक्षण मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्तींना पाठवण्यात आल्या आहेत. यावर लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय.
नेमके प्रकरण काय?
विद्यापीठाने PET-२०२४ चे नोटिफिकेशन १ जुलै २०२४ रोजी जाहीर केले. अर्ज ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत स्वीकारले गेले. PET परीक्षा ३ ऑक्टोबर २०२४ रोजी झाली. त्यानंतर RRC मुलाखती ४ ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झाल्या आणि RRC निकाल २५ मार्च २०२५ रोजी जाहीर झाला. निवड झालेल्या संशोधकांचे प्रस्ताव RAC मार्फत ६ जून २०२५ पर्यंत विद्यापीठात सादर झाले. एकूण १४३६ विद्यार्थी PET प्रक्रियेत यशस्वी झाले. मात्र, अद्याप त्यांना पुढील संशोधन प्रक्रियेची कोणतीही अधिकृत कागदपत्रे मिळालेली नाहीत.
याचिकेमुळे प्रक्रिया ठप्प
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये रिट याचिका क्रमांक १ ते १० प्रलंबित असल्यामुळे प्रक्रिया ठप्प असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या याचिकांमुळे १४३६ संशोधकांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप ‘एसएफआय’ने केला आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला व न्यायालयाला याचिका फास्टट्रॅकवर चालवून तातडीने निकाली काढण्याची विनंती केली आहे.

फेलोशिपसाठी कागदपत्रे आवश्यक
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सारथी, बार्टी, महाज्योती, ARTI, अमृत यांसारख्या सरकारी संस्थांच्या फेलोशिपसाठी प्रोव्हिजनल व कन्फर्मेशन लेटर अनिवार्य आहे. मागील दोन वर्षांपासून जाहिराती निघालेल्या नसून लवकरच त्या येणार असल्याचे वृत्तपत्रांतून समजते आहे, परंतु आवश्यक कागदपत्रे न मिळाल्यास संशोधक फेलोशिपपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी संभ्रमात
गेल्या १८ महिन्यांपासून या प्रक्रियेत गुंतून वेळ, पैसा आणि मेहनत, घालवूनही संशोधन सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. प्रक्रियेला इतका अवाजवी काळ लागल्याने पीएच.डी. करावी की सोडून द्यावी, असा प्रश्न संशोधक विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण झाला आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी न्यायालयीन प्रक्रिया जलद निकाली निघावी व त्यांचे उच्च शिक्षण सुरक्षित रहावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. या प्रसंगी एसएफआय जिल्हा सचिव अरुण मते, एकनाथ तिरमले,प्रतिक गंगावणे,सुरज देवकर,मनोरमा नरवडे, मीरा सावंत व विद्यार्थी उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



