
Swargate To Katraj Metro: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. पुण्यातील महत्त्वकांक्षी असलेल्या मेट्रो मार्गिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वारगेट ते कात्रज या महत्त्वकांक्षी मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यासाठी अखेर निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळं लवकरच या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे भूमिपूजन 29 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. मात्र त्यानंतर मेट्रो मार्गिकेचे काम रखडले होते. या मार्गावर आणखी दोन स्थानके समाविष्ट करावीत, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. त्यानंतर बिबवेवाडी आणि बालाजीनगर ही दोन स्थानकांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पाच मेट्रो स्थानके उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. आता मेट्रो मार्गिकेचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे.
स्वारगेट ते कात्रज ही पूर्णपणे भूमिगत मेट्रो असून या मार्गिकेवर पाच स्थानके आहेत. तसंच, ही मेट्रो मार्गिका 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्वारगेट ते कात्रज मार्गासाठी एकूण 3 हजार 500 कोटी रुपये खर्च होणार आहे. तर जमिनीपासून 12 ते 28 मीटर खोलवर भूमिगत मेट्रोचे काम होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात टनेल बोअरिंग मशीनद्वारे काम सुरू होणार आहे.
अशी असतील स्थानके?
मेट्रो मार्गिकेवर मार्केटयार्ड, बिबवेवाडी (विवेकानंद पुतळा), बालाजीनगर (धनकवडी), भारती विद्यापीठ आणि कात्रज ही स्थानके असतील. या परिसरात वाहतुकीची समस्या भीषण आहे. शहरातील सर्वाधिक रस्ते अपघात होणाऱ्या भागामध्ये कात्रज परिसराचा क्रमांक वरचा आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील अपघात, प्रदूषण, इंधन खर्च बचत आणि प्रवास कालावधीत बचत होण्याची अपेक्षा आहे.
FAQ
प्रश्न १: पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गिकेला कोणत्या संस्थेकडून कामासाठी मंजुरी मिळाली आहे?
उत्तर: या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यासाठी अखेर निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे, ज्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
प्रश्न २: स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे भूमिपूजन कधी झाले होते?
उत्तर: या मार्गाचे भूमिपूजन २९ सप्टेंबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.
प्रश्न ३: हा मेट्रो मार्ग कोणत्या स्वरूपाचा असेल आणि त्याची लांबी अंदाजे किती असेल?
उत्तर: हा मार्ग पूर्णपणे भूमिगत (Underground) असणार आहे. जमिनीपासून १२ ते २८ मीटर खोलवर या भूमिगत मेट्रोचे काम होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



