
Pune Commissioner bungalow: आजवर आपण अनेक चोरीच्या घटनांबाबत ऐकलं असेल..मात्र आता थेट पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात मोठी चोरी झालीय.एसी, टीव्ही, झुंबर यासारख्या अनेक महागड्या वस्तू बंगल्यातून गायब झाल्या.आयुक्त निवृत्त झाले. पण बंगल्यातील वस्तूंना पाय फुटले का, असा सवाल आता विचारला जातोय.
पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यातून लाखोंचं साहित्य गायब झालंय. यामध्ये एसी झुंबर, टीव्ही, अॅक्वागार्ड यासह लाखो रुपयांचं साहित्य गायब झालंय.मॉडेल कॉलनी इथं आयुक्तांचा हा बंगला आहे.विशेष म्हणजे या बंगल्याला कडक सुरक्षा व्यवस्था असते.. मात्र तरिही बंगल्यातील वस्तू कशा गायब झाल्या याबाबत प्रश्न उपस्थित होतोय.
बंगल्याची जबाबदारी नेमकी कुणाची?
चौफेर सीसीटीव्ही, २४ तास सुरक्षा पण तरीही एकूण २० लाखांचं सामान गायब झाल्याचं स्पष्ट झालंय.आता आयुक्त नवलकिशोर राम बंगल्यात राहायला येणार आहेत, त्यामुळे ‘पूर्ववत व्यवस्था’ करण्याची लगबग सुरू झालीय. पण जुनी व्यवस्था कुठे गेली, हेच कोडं अजून उलगडलं नाही.तर या बंगल्याची जबाबदारी नेमकी कुणाची? याचं कोणतंच ठोस उत्तर मिळालं नाहीय…यावर आता पालिका आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याचं म्हटलंय.
बंगल्यातलं हे गूढ कोण उकलतंय?
महापौरांच्या बंगल्यातून १० वर्षांपूर्वी टीव्ही चोरी गेला होता, तो चोर अजूनही सापडलेला नाही.आणि आता आयुक्त बंगल्यातून गायब झालेलं लाखोंचं सामान पण अजून कुणीही पोलिसांत तक्रार केली नाही तर, प्रशासकीय गोपनीयतेच्या नावाखाली या चोरीवर पडदा टाकायचा प्रयत्न होतोय का? असा सवाल उपस्थित होतोय. “कॅमेऱ्यावर लक्ष, पण घरात लक्ष नाय’ हेच म्हणावं लागेल. आता पाहावं लागेल की, बंगल्यातलं हे गूढ कोण उकलतंय.
FAQ
1.पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात नेमकी काय चोरी झाली आहे?
पुणे महापालिका आयुक्तांच्या मॉडेल कॉलनी येथील बंगल्यातून एसी, टीव्ही, झुंबर, अॅक्वागार्ड, ब्राँझचे दिवे, किचन टॉप युनिट, डायनिंग टेबल, कॉफी मशिन, वॉकीटॉकी सेट, रिमोट बेल्स, सोफा, खुर्च्या, आणि फुलांच्या कुंड्या यासह सुमारे 20 ते 30 लाख रुपये किमतीचे साहित्य गायब झाले आहे.
2. ही चोरी कधी आणि कशी उघडकीस आली?
माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मे 2025 मध्ये सेवानिवृत्ती घेतल्यानंतर जुलै महिन्यात बंगल्याचा ताबा सोडला. नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर राम यांना बंगला ताब्यात देण्यापूर्वी भवन, विद्युत आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याची पाहणी केली, तेव्हा हे साहित्य गायब असल्याचे समोर आले.
3. बंगल्याला कोणती सुरक्षा व्यवस्था होती?
बंगला मॉडेल कॉलनी येथे अर्धा एकराच्या प्रशस्त जागेत आहे. येथे 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे आणि महापालिकेचे सुरक्षारक्षक तैनात होते. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य गायब झाल्याने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
4. या चोरीबाबत कोणती कारवाई करण्यात आली आहे?
आयुक्त नवलकिशोर राम यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप या चोरीबाबत पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही, आणि महापालिकेने याबाबत गोपनीयता पाळली आहे.
5. गायब झालेल्या साहित्याची किंमत किती आहे?
वेगवेगळ्या अहवालांनुसार, गायब झालेल्या साहित्याची किंमत 20 ते 30 लाख रुपये आहे. यामध्ये ॲंटिक वस्तू, झुंबर, एसी, एलईडी टीव्ही, आणि इतर महागड्या वस्तूंचा समावेश आहे.
6. बंगला पुन्हा तयार करण्यासाठी काय केले जात आहे?
नवलकिशोर राम लवकरच या बंगल्यात राहण्यासाठी येणार असल्याने, बंगला पूर्ववत करण्यासाठी 20 लाख रुपये खर्चून नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एसी, टीव्ही, वॉटर प्युरिफायर यासारख्या वस्तूंचा समावेश आहे.
7. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत का?
होय, सुमारे 10 वर्षांपूर्वी पुणे महापौरांच्या बंगल्यातून एक टीव्ही चोरी गेला होता, आणि त्या प्रकरणातील चोर अद्याप सापडलेला नाही. त्या वेळी प्रशासनाने तक्रार दाखल केली होती, परंतु या प्रकरणात अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.
8. बंगल्याची जबाबदारी कोणाची आहे?
बंगल्याची जबाबदारी पुणे महापालिकेच्या भवन, विद्युत आणि सुरक्षा विभागाची आहे. मात्र, साहित्य गायब होण्याबाबत कोणतीही स्पष्ट जबाबदारी निश्चित झालेली नाही, आणि याबाबत कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.