digital products downloads

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरणारे जेरबंद: पोलिसांनी २० दुचाकी जप्त केल्या, १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत – Pune News

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरणारे जेरबंद:  पोलिसांनी २० दुचाकी जप्त केल्या, १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत – Pune News



उत्तमनगर पोलिसांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २० चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून, त्यांची किंमत १५ लाख रुपये आहे. या प्रकरणी महेश हनुमानसिंग राजपूत (वय २३, रा. एनडीए पोलीस चौकीमागे, उत्तमनगर) याला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी वाहतूक नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. विविध संशयित वाणांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला दुचाकीवरून जाताना थांबवले. त्याच्या दुचाकीला वाहन क्रमांकाची पाटी नव्हती. संशय आल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रे नव्हती. चौकशीदरम्यान, अल्पवयीन मुलाने त्याचा साथीदार राजपूत याच्या मदतीने उत्तमनगर भागातून दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी राजपूतला ताब्यात घेतले. त्यानेही दुचाकी चोरीची कबुली दिली. तपासात राजपूत आणि अल्पवयीन साथीदाराने कोथरूड, उत्तमनगर, वारजे, भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, बावधन तसेच ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. मौजमजेसाठी त्यांनी हे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. याबाबत पुढील तपास उत्तमनगर पोलिस करत आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, उपनिरीक्षक चेतन धनवडे, मुकेश कुरेवाड, राजनारायण देशमुख, प्रदीप शेलार, पृथ्वीराज गायकवाड, चेतन बराटे आणि परमेश्वर पाडळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp