
Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातल्या नानापेठेत कोमकर-आंदेकर गँगमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे पुमे शहर हादरले. गँगवार करत पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडावर पुणे पोलिस कठोर कारवाई करत आहेत. अशातच आता पुणे पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. एकाच दिवसात 43 गुंडांना अटक करण्यात आली आहे.
नवरात्रीसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आणि टोळ्यांमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी गुन्हेगारांविरोधातील मोहिम अधिक कडक केली आहे. झोन 1 ने आज 43 जेल पास केले आहेत. सर्व एकाच दिवसात केले आहेत. नवराञोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवसात 43 गुंडांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोवृलिसांनी अटक केलेल्यांपैकी अनेक जण आंदेकर टोळीचे सदस्य आहेत. तर काही गुंड हे मर्डर तसेच गंभीर गन्हे दाखल असलेले आरोपी आहेत. नवराञोत्सवात रेकॉर्डवरच्या सराईत गुंडांनी कोणतीही गडबड करू नये, म्हणून तब्बल 42 गुंडांना स्थानबद्ध करत अटक केली आहे. अवघ्या एकाच दिवसात ही कारवाई केली गेली आहे. झोन 1 चे उपायुक्त कृषिरेश रावले यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. आंदेकर गँग पण झोन वनच्याच हद्दीत येते.
भर रस्त्यात प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार
कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीकडून हा गोळीबार करण्यात आला. गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या वादातून आरोपींनी भर रस्त्यात प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनी घायवाळ टोळीतील सर्वच आरोपींना अटक केली. प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर याच आरोपींनी वैभव साठे या आणखी एका नागरिकावर कोयत्याने वार केलेत. प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे गुन्हेगार सागर कॉलनी या ठिकाणी गेले आणि तिथे उभ्या असलेल्या वैभव साठे यांच्यावर विनाकारण हल्ला केला. निलेश घायवळ टोळीतील हे गुन्हेगार हल्ला करताना “आम्ही इथले भाई आहोत” असं म्हणत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. घायवाळ टोळीतल्या सर्व आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत… या दोन्ही घटनांमध्ये निलेश घायवळ याचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
FAQ
1 पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ का झाली आहे?
पुण्यात कोमकर-आंदेकर गँगमधील गोळीबारासारख्या घटनांमुळे दहशत माजली आहे. नानापेठ परिसरात गँगवारमुळे शहर हादरले असून, पोलिस गुंडांवर कठोर कारवाई करत आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर टोळ्यांमधील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची मोहिम कडक झाली आहे.
2 पुणे पोलिसांनी एकाच दिवशी किती गुंडांना अटक केली?
नवरात्रीसाठी प्रतिबंधात्मक कारवाईत पुणे पोलिसांच्या झोन १ ने एकाच दिवशी ४३ गुंडांना अटक केली आणि त्यांना जेलमध्ये पाठवले. ही कारवाई सराईत गुंडांना रोखण्यासाठी केली गेली.
3 अटक केलेल्या गुंडांबद्दल काय माहिती आहे?
अटक केलेल्यांपैकी अनेक आंदेकर टोळीचे सदस्य आहेत. त्यांच्यावर मर्डरसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. नवरात्रीत गडबड टाळण्यासाठी ही कारवाई झाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.