
Pune Crime News : पुणे-बंगळुरु महामार्गावर एक खळबळजनक प्रकार घडला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्यातल्या डॉक्टर महिलेची आत्महत्या केली आहे. कारच्या शेजारीच या डॉक्टर महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
सांगलीच्या इस्लामपूर नजीक पुण्यातील एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शुभांगी वानखडे (वय 44) असे या डॉक्टर महिलेचे नाव आहे. शुंभांगी यांनी स्वतःच्या कारमध्ये ब्लेडने हाताचे नस कापून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील विठ्ठलवाडी येथे शुभांगी वानखडे या त्यांच्या कार शेजारीच मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत या प्रकरणी तपास सुरू केला होता. शुभांगी वानखडे यांनी नैराश्यपोटी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगितलं आहे.
शुभांगी वानखडे या पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करत होत्या. घटनेच्या दिवशी त्या पुण्यातून हॉस्पिटलला जाण्यासाठी घरातून निघाल्या. यानंतर त्या थेट कोल्हापूरच्या निपाणी पर्यंत आल्या. त्यानंतर पुन्हा पुण्याकडे जात असताना त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी येथे पुणे बंगळूर महामार्गावर त्यांनी आपल्या कारमध्येच स्वतःच्या हाताच्या नसा ब्लेडने कापून आणि मानेवर वार करून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांनी सांगितला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.