digital products downloads

पुणे – बुधवार पेठेतून पोलिसांनी अल्पवयीन शाळकरी मुलींना ताब्यात घेतल्याने खळबळ; महिला म्हणाली ‘आम्ही झोपेत असताना…’

पुणे – बुधवार पेठेतून पोलिसांनी अल्पवयीन शाळकरी मुलींना ताब्यात घेतल्याने खळबळ; महिला म्हणाली ‘आम्ही झोपेत असताना…’

Pune Police taken minor girls in Custory from Budhwar Peth: पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत 11 फेब्रुवारीला मोठी कारवाई केली होती. पुणे पोलिसांनी बांगलादेशी महिलांच्या विरोधात कोम्बिंग ऑपरेशन राबवत कारवाई केली होती. या कारवाईत 11 बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान यावेळी चार अल्पवयीन मुलींना देहविक्री व्यवसायाशी कोणताही संबंध नसतानाही ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पोलिसांनी बुधवार पेठेत राहणाऱ्या चार अल्पवयीन मुलींना त्यांचा देहविक्री व्यवसायसाठी कुठलाही संबंध नसतानाही कारवाई केली आहे. यामध्ये एका दहावीमध्ये शिकणाऱ्या कराटेपटूला वेश्या व्यवसाय करते म्हणून तिच्यावर कारवाई केल्याचा आरोप मुलीच्या आईने आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. मुलीची आई पुण्यातील मर्जी गल्लीत राहायला आहे. 

मुलीच्या आईने या ठिकाणी कोणताही देहविक्री व्यवसाय सुरू नसताना, मी माझ्या मुलांसोबत रात्री झोपेत असताना पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी माझ्या मुलांना ताब्यात घेऊन देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलेसोबत उभं केलं. तिच्यावर अल्पवयीने म्हणून कारवाई केली. 

 

मुलगी शाळेत शिकत असलेल्या शाळेतही पुणे पोलीस वर्दीत गेल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या सगळ्या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

18 फेब्रुवारीलाही पोलिसांची कारवाई

बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी पुणे शहरात कारवाई केली. बुधवार पेठ परिसरात अवैध वास्तव्य आणि देहविक्रय व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन करुन धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या छापेमारीत 22 महिलांना ताब्यात घेतलं असून यात 11 बांगलादेशी महिलांचा समावेश आहे. पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या टीपनंतर हे सर्च ऑपरेशन करण्यात आले. 

या 11 बांगलादेशी महिलांना बोगस आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे अवैधरित्या भारतात आणण्यात आले होते. त्यामुळे या महिलांवर अनधिकृपणे कुंटणखान्यांमध्ये काम करत असल्याचा आरोप पोलिसांनी करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

यापूर्वीही पुणे पोलिसांनी 11 फेब्रुवारीला बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन केलं होतं. ही कारवाई मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान 41 इमारती आणि गल्लीबोळांमध्ये करण्यात आली होती. या परिसरात पोलिसांनी एका जागेचा शोध घेतला होता. या कारवाई दरम्यान 700 हून अधिक नागरिकांची चौकशी केली गेली होती.

 या कारवाई पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांसह चार अल्पवयीन मुलींची सुटका केली होती. एवढंच नाही तर 7 ग्रॅम चरस तसंच नशेची इंजेक्शन्स जप्त केले होते. पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, अवैध स्थलांतर, मानव तस्करी आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे.   दरम्यान बुधवार पेठेतील 11 बांगलादेशी महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तर संबंधित महिलांवर तसंच कुंटणखाना चालवणाऱ्यांवर पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp