
Pune Real Estate: देशातील रिअल इस्टेट मार्केट चांगलेच तेजीत आले आहे. अशातच भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आयटी हब असलेल्या पणे शहराच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये वेगळाच ट्रेंड पहायला मिळत आहे. पुण्यात नवीन लॉन्च झालेल्या घरांच्या सरासरी किमतीत घट झाली असली तरी घर भाड्याने महाग झाले आहे.
प्रॉपर्टी कन्सल्टंट कुशमन अँड वेकफिल्डच्या अलीकडील अहवालात हा अनोखा ट्रेंड उघड झाला आहे. घर खरेदीदार, गुंतवणूकदार आणि भाडेकरूंसाठी नवीन आव्हाने येत आहेत.
वेकफिल्ड अँड कुशमनच्या अहवालानुसार, 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) पुण्यातील मालमत्तेचे भारित सरासरी भांडवली मूल्य मागील तिमाहीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी घसरून 11,113 रुपये प्रति चौरस फूट झाले अहवालानुसार, हे मंदीचे लक्षण नाही तर बांधकाम व्यावसायिकांच्या बदलत्या प्राधान्यक्रमांमुळे झाले आहे.
विकसक आता महागड्या आणि आलिशान घरांऐवजी मध्यमवर्गीय घरांवर, म्हणजेच मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी असलेल्या घरांवर लक्ष केंद्रित करत आहेत. अहवालानुसार, या तिमाहीत सुरू झालेल्या एकूण युनिट्सपैकी 58 टक्के घरे मध्यम श्रेणीतील होती.
पुण्यातील प्रमुख पॉश भागात घरांच्या किमती अजूनही वाढत आहेत. उदाहरणार्थ, कोरेगाव पार्क आणि नगर रोड सारख्या भागात तिमाही-दर-तिमाहीत 1 ते 2 टक्के वाढ झाली. घरांच्या किमतींमधील या ट्रेंडच्या उलट, पुण्यातील घरांच्या भाड्यात सातत्याने वाढ होत आहे. अहवाल दर्शवितात की तिमाही आधारावर भाड्यात 1 ते 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पुण्यात मोठे आयाटी हब आहे. यामुळे सातत्याने येथे लोक नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहेतय. यामुळे भाड्याच्या घरांची मागणी वाढली आहे. आयटी कर्मचारी विशेषतः हिंजवडी, खराडी आणि नगर रोड सारख्या भागात मोठ्या प्रमाणात घर भाड्याने राहण्यासाठी घेत आहेत.
गुंतवणूकदारांसाठी कोणते संकेत आहेत?
पुण्यातील हा अनोखा ट्रेंड वेकफिल्ड आणि कुशमन अहवाल गुंतवणूकदारांसाठी, विशेषतः कमी गुंतवणुकीसह चांगले भाडे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा करणाऱ्यांसाठी चांगले संकेत देणारा आहे. दरम्यान, घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी, मध्यम श्रेणीतील वाढलेले पर्याय सुवर्णसंधी देऊ शकतात. तथापि, भाड्याने घेणाऱ्यांसाठी वाढत्या किमती एक आव्हान आहेत.
FAQ
1 पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये सध्या कोणता अनोखा ट्रेंड दिसत आहे?
पुण्यातील नवीन लॉन्च झालेल्या घरांच्या सरासरी किमतीत घट झाली असली तरी घरांच्या भाड्यात वाढ होत आहे. हे देशातील तेजीत रिअल इस्टेट मार्केटमध्ये वेगळे आहे
2 कुशमन अँड वेकफिल्डच्या अहवालानुसार २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत काय घडले?
जुलै-सप्टेंबर २०२५ मध्ये पुण्यातील मालमत्तेचे भारित सरासरी भांडवली मूल्य मागील तिमाहीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी घसरून ११,११३ रुपये प्रति चौरस फूट झाले. हे मंदीचे लक्षण नसून, बांधकाम व्यावसायिकांच्या बदलत्या प्राधान्यांमुळे झाले आहे
3. घरांच्या किमतींमधील घट का झाली?
विकसक आता महागड्या आणि आलिशान घरांऐवजी मध्यमवर्गीय घरांवर लक्ष केंद्रित करत आहेत. या तिमाहीत सुरू झालेल्या एकूण युनिट्सपैकी ५८ टक्के घरे मध्यम श्रेणीतील होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.