
Pune Municipal Election (चंद्रकांत फुंदे) : पुणे मनपाची 2017साली समाविष्ट 11 गावांसाठी पोट निवडणूक झाली त्यावेळी या गावांना अवघे 2 नगरसेवक मिळालेले. आता पुन्हा 23 गावं नव्याने पालिकेत समाविष्ट झालीत. त्यामुळे हद्दवाढ भागाची प्रभाग रचना होताना 2011 च्या जनगणनेचा निकष लावला गेला तर या गावांची कागदोपञी लोकसंख्या ही काही हजारात तर प्रत्यक्ष मतदार हे लाखांमध्ये असणार आहेत.
कारण गेल्या काही वर्षात या हद्दवाढ भागात प्रचंड शहरीकरण झालंय त्यातुलनेत सुविधा काहीच नाहीत…म्हणूनच आमागी पालिका निवडणुकीत या गावांमधून पुरेसे नगरसेवक निवडून द्यायचे असतील प्रभाग रचना आम्हाला वेगळा न्याय मिळावा, अन्यथा आम्ही प्रसंगी कोर्टात जाऊ, अशा इशाराच 34 गावं कृती समिताने दिला आहे.
पुणे मनपाची निवडणूक ही 2011 च्याच जनगणने अनुसार होणार असल्याने पालिकेला अवघे 165 नगरसेवक मिळणार आहेत. त्यातही हद्दवाढ भागातील गावांना अवघे 6-7 नगरसेवक मिळू शकतात. कारण 85 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग बनतोय आणि तोच निकष कायम राहिला तर या गावांमधून खूप कमी नगरसेवक निवडून जातील म्हणूनच शासनाने ठरवलं तर 2011 च्या जनगणनेचा निकष शासन नक्कीच बदलून या गावांची प्रभाग रचना विधानसभा मतदार यादीनुसार नक्कीच करू शकते, असंही मत जाणकारांनी नोंदवल आहे.
पुणे मनपा लगतच्या 34 गावांचा समप्रमाणात विकास व्हावा, म्हणूनच शासनाने या गावांना पालिका हद्दीत समाविष्ट केले. पण त्यांनाच लोकसंख्या अनुसार पुरेसे नगरसेवक मिळणार नसतील तर मग या गावांना पुरेसा निधी मिळणार तरी कसा? आणि त्यांचा विकास होणार तरी कसा? हा प्रश्न उपस्थित होतोय म्हणूनच शासनाने वाढलेली मतदारसंख्या लक्षात घेऊनच हद्दवाढीतील समाविष्ट गावांची प्रभाग रचना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.