
पुणे शहर व जिल्ह्यात महावितरणामार्फत विविध योजनेतून विजेची पायाभूत कामे सुरु आहेत. मात्र भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून महावितरणला जादा खुदाई शुल्क आकारले जात असल्याने अनुमानित रकमेत प्रकल्पाची कामे होत नाहीत. त्यामुळे पुणे महापालि
.
या बैठकीत महावितरणतर्फे जिल्ह्यात सुरु असलेल्या आरडीएसएस, पीएम सूर्यघर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदींसह जिल्हा विकास निधीतून मिळणाऱ्या योजनेतील कामाचे सादरीकरण करण्यात आले. आरडीएसएस योजनेतून विद्युत वाहिन्यांचे बळकटीकरण करण्यासाठी १७८ कोटींचा निधी मिळाला आहे. यामध्ये जिल्ह्यात ११ नविन उपकेंद्रे व १७ उपकेंद्राची क्षमतावाढीसह इतर कामे होणार आहेत. वितरण हानी कमी करण्यासाठी पुणे शहरात १३२० किमी उच्चदाब वाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. तर १४६ ठिकाणी नविन रोहित्रे उभारली जाणारआहेत. तसेच ग्रामीण भागासाठी ५०५ कोटी निधी मिळाला असून यानिधीतून २४०८ किमी उच्चदाब व २०६४ किमी लघुदाब वाहिन्यांची कामे होणार आहेत. याशिवाय २९८४ वितरण रोहित्रेही उभारली जाणार आहेत.
आरडीएसएस योजनेतील कामांची व्याप्ती पाहता यामध्ये भूमिगत वाहिन्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने व जादा खुदाई शुल्कामुळे या कामांच्या पूर्णत्वास विलंब होत असल्याचे पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पवार यांनी महापालिका आयुक्तांना खुदाई शुल्क आकारणी करताना पिंपरी चिंचवड मनपाची कार्यपद्धती अवलंबावी. पिंपरी मनपा १०० रुपये प्रतिमिटर इतके पर्यवेक्षण शुल्क घेते. यामध्ये खोदलेला रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी महावितरणची असते. तर पुणे महानगरपालिका प्रतिमिटर ६६०० रुपये इतकी आकारणी करते. ज्यामध्ये रस्ते दुरुस्तीचा अंतर्भाव आहे.जिल्हा विकास निधीतूनही महावितरणला गतवर्षी ४० कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित होता. त्यापैकी २१ कोटी निधी महावितरणला प्राप्त आहे. तर चालू २०२५-२६ वर्षासाठी महावितरणने जिल्हा विकास निधीतून ९४ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिलेला आहे.
पीएम-सूर्यघर योजनेला गती द्या
पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा आतापर्यत २० हजार ७६ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्याची स्थापित क्षमता जवळपास ९४ मेगावॅट इतकी आहे. या योजनेला महावितरणने अधिक गती द्यावी. त्याचा प्रचार प्रसार करुन वीज ग्राहकांना या योजनेसाठी प्रोत्साहित करावे असेही पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.