
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर’ सायकलिंग स्पर्धेसाठी रस्ते विकास, वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि सुरक्षा यांसारख्या बाबींचे काटेकोर व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी सायकलिंग
.
डॉ. पुलकुंडवार विभागीय आयुक्त कार्यालयात ‘पुणे ग्रँड चॅलेज टूर सायकलिंग’ स्पर्धेच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आर. एस. रहाणे, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, पिंपरी चिंचवड वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे आणि आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. प्रशांत वडेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेसाठीच्या रस्त्यांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेताना डॉ. पुलकुंडवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, दोन्ही महानगरपालिका, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला CFI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्याचे निर्देश दिले. दरवर्षी स्पर्धा होणार असल्याने रस्ते टिकाऊ आणि उच्च दर्जाचे असावेत, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नये, असे त्यांनी सांगितले.
पावसाचे पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था करावी. तसेच, योग्य मार्गदर्शक फलक आणि पर्यटन स्थळांचे फलक लावावेत. स्पर्धेला अडथळा ठरणारे जाहिरात फलक (होर्डिंग्ज) तातडीने काढून टाकावेत. सर्व यंत्रणांनी स्पर्धा संपेपर्यंत रस्त्यांची नियमित तपासणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
स्पर्धा मार्गावर भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. मार्गावरील गावांमध्ये पाळीव जनावरे स्पर्धा कालावधीत रस्त्यावर येणार नाहीत यासाठी जनजागृती करावी. स्पर्धा कालावधीत मार्गावर कोणत्याही प्रकारची वाहतूक येणार नाही याची खात्री करून वाहतूक वळविण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
मार्गावर केबल टीव्ही वायर्स, विजेच्या वाहिन्या आदींचा कोणताही अडथळा असणार नाही याची खात्री करावी. वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिसांनी आवश्यक मनुष्यबळ नेमावे, गरजेनुसार अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था करावी आणि त्यांना प्रशिक्षण द्यावे. एनसीसी तसेच होमगार्डची सेवा घ्यावी आणि मार्गावरील गावातील स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या युवकांची मदत घ्यावी. मार्गावर संपर्क व्यवस्था कार्यरत राहावी यासाठी सर्व तांत्रिक बाबी तपासून यंत्रणा उभारावी, अशा सूचनाही डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



