
Satara IT Park : पुण्यातील हिंडवडी येथील IT पार्क हे भारतातील दुसऱ्या क्रमकांचे आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे IT पार्क आहे. हिंडवडी आयटी पार्कमध्ये शेकडो नॅशनल तसेत इंटरनॅशलन आयटी कंपन्या आहेत. हिंडवडीच्या आयटी पार्कमध्ये कोट्यावधीची उलाढाल होते. हजारो लोक येथे नोकरी करतात. हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी आणि स्थानिक पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुणे विमानतळाजवळील पुरंदर येथे एक नवीन आयटी पार्क उभारण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच पुण्यातील या दोन IT पार्कनंतर सोलापूर जिल्ह्यात तिसरे मोठे IT पार्क उभारले जात आहे. अशातच पुणे, सोलापूर नंतर आणखी एका जिल्ह्यात महाराष्ट्रातील चौथे मोठे IT पार्क उभारले जात आहे.
महाराष्ट्रातील चौथे मोठे IT पार्क सातारा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. पुण्यातील दोन, सोलापूर एक आणि सातारा एक असे मिळून चार IT पार्क पश्चिम महाराष्ट्रात येत्या काळात पहायला मिळणार आहे. साताऱ्यातील पुणे-बंगळुरू महामार्गावर नागेवाडी येथे महाराष्ट्रातील चौथे IT पार्क उभारले जाणार आहे. येथील 42 हेक्टर 87 आर इतकी जागा आयटी पार्कसाठी औद्योगिक क्षेत्र म्हणून शासनाच्या उद्योग विभागाने जाहीर केली आहे. यामुशे साताऱ्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.
सातारा जिल्ह्यातील युवकांना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळावी, यासाठी सातारा जिल्ह्यात आयटी पार्क व्हावे अशी मागणी केली जात होती. करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. या नव्या IT पार्कमुळे सातारा जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या शोधात मुंबई, पुण्याला जावे लागणार नाही. IT इंजिनीयर तसेत IT क्षेत्रात काम करणाऱ्यांना तरुण, तरुणींना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळणार आहे. नागेवाडी (लिंब खिंड) (ता. सातारा) येथील शासकीय जागेत आयटी पार्क उभारण्यात यावा, यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला होता. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी विभागामार्फत या जागेची पाहणी करण्यात आली होती. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार त्याचा परिपूर्ण अहवाल आणि प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.
सातारा IT पार्क संदर्भातील प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे त्यांनी मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठवला होता. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत नागेवाडी येथील गट नं. 308/1 येथील 42 हेक्टर 87 आर एवढे क्षेत्र आयटी पार्क यासाठी आरक्षित करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच पुढील कार्यवाही गतीने केली जाणार आहे. पुढील कार्यवाही गतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



