
Pune Politics : पुण्याच्या राजकारणात खळबळ प्रकार घडला आहे. पुणे काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यावर एका महिला नेत्याने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसमध्ये मी ब्राह्मण असल्याने मला त्रास देण्यात आला. माझ्यावर ब्राह्मण असल्याने ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा कट कारस्थान देखील करण्यात आल्याचा आरोप या महिला नेत्याने केला आहे.
संगीता तिवारी असे या महिलेचे नाव आहे. संगीता तिवारी या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष आहेत. मला पुणे शहराचं प्रभारी महिला शहराध्यक्ष पद देण्यात आले मात्र हे शहर अध्यक्ष पद दिल्यानंतर जे महिला अध्यक्ष साठी जी कार्यालय होते ते माझ्याकडून काढून घेण्यात आली.
हे कार्यालय दुसऱ्या सेलच्या पदाधिकाऱ्याला देण्यात आली. हे कार्यालय काढून घेतल्यानंतर मी रागात येऊन कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करेन या दृष्टिकोनातून कटकारस्थान रचून असं केल्यास माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा देखील कट पुणे शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांच्या माध्यमातून रचला गेला असल्याचा अत्यंत गंभीर आरोप तिवारी यांनी केला आहे.
नेता असो किंवा कार्यकर्ता खास करून महिला पदाधिकारी किंवा महिला कार्यकर्ता ह्यांची आपल्याच पक्षात घुसमट होत असेल, अंतर्गत जाणून-बुजून जर त्यांना त्रास देण्यात येत असेत तर वेगळा निर्णय हा घेतलाच पाहिजे.
एखाद्या पक्षाला काम करणाऱ्या लोकांची गरज च नसेल, संघटनेची पण गरज नसेल तर निश्चितच वेगळा विचार करायला लागतो. मग त्याला गद्दारी धोका एहसान फरामोश असे काही म्हणा. कुठेतरी सहनशक्ती संपते हो. खासकरून महिला खूप सहन करतात.
शेवटी पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता त्याची जर किंमतच पक्ष करत नसेल तर त्या व्यक्तीने स्वतः विचार करून एक वेगळा निर्णय हा घेतलाच पाहिजे. अश्या वेळी जिथे काम करायला संधी आहे तुमच्या कामाची किंमत आहे , असा पक्ष निवडून निर्णय घेणे गरजेचे असते.मग तो गद्दार, धोकेबाज, एहसान फरामोश म्हणले जाते असं संगीता तिवारी म्हणाल्या. संगीता तिवारी यांना भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार ) पक्षांकडून ऑफर आली आहे. येत्या 8 दिवसांत संगीता तिवारी पुढचा निर्णय जाहीर करणार आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.