
Dadasaheb Bhagat Success Story : Canva फोटो एडिंटींग सॉफ्टवेअर सध्या चांगलेच ट्रेडिंगमध्ये आहे. वापरायला सोपे असलेले हे सॉफ्टवेअर अनेकजण वापरतात. पुण्याच्या एका IT कंपनीत ऑफिसबॉय म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने Canva ला टक्करे देणारे सॉफ्टवेअर बनवले. इन्फोसिसमध्ये काम करताना त्याला एक कल्पना सुचली आणि त्याने Canva ला टक्कर देणारे ‘डूग्राफिक्स’ नावचे सॉफ्टवेअर बनवले.
दादासाहेब भगत असे Canva हे फोटो एडिंटींग सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दादासाहेब भगत हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका छोट्या गावचा आहे. दादासाहेबचे गाव दुष्काळग्रस्त भागात आहे. शेती करणे कठीण होते आणि कुटुंबात शिक्षणाला महत्त्व नव्हते. दादासाहेबने फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर आयटीआयचा एक छोटासा अभ्यासक्रम केला. त्यानंतर, ते नोकरीच्या शोधात पुण्याला गेले आणि त्यांना 4,000 रुपये महिन्याला नोकरी मिळाली.
काही काळानंतर, त्याला इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून 9,000 रुपये पगाराची नोकरी मिळाली. ही एक महत्त्वाची ऑफर होती, म्हणून त्याने लगेच नोकरी स्वीकारली. साफसफाई, साहित्य वाहून नेणे आणि गेस्ट हाऊसमध्ये छोटी-छोटी कामे तो करायचा. इन्फोसिस कंपनीत काम करत असताना त्याने कर्मचाऱ्या निरीक्षण केले. इन्फोसिसचे कर्मचारी संगणकावर काम करून चांगले पैसे कमवत आहेत. यामुळे त्याने कॉम्प्युटरचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. त्याने लोकांना विचारले की तो असे काम कसे करू शकतो. जेव्हा त्यांना कळले की तो फक्त दहावी पास आहे. तेव्हा अनेकांनी सांगितले की ते कठीण होईल. परंतु काहींनी त्याला ग्राफिक डिझाइन आणि अॅनिमेशनचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला, जिथे प्रतिभा पदवीपेक्षा जास्त महत्त्वाची असते.
त्याने ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला. महिनाभरात तो डिझायनर बनला. ऑफिस बॉय असलेल्या दादासाहेबला ग्राफिक्स डिझाईनरती नोकरी मिळाली. मोठ्या कंपनीत नोकरी शोधण्याऐवजी, त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू, त्याने ‘डूग्राफिक्स’ (डिझाइन टेम्पलेट) नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. सुरुवातीला अडचणी आल्या, पण त्याने हार मानली नाही. कोविडमध्ये लॉकडाऊन दरम्यान सर्वकाही बंद पडल्यावर त्याला पुण्याहून त्याच्या गावी परतावे लागले. गावात वीज आणि इंटरनेटची समस्या होती, पण त्याने हे अडथळे बनू दिले नाहीत. तो त्याच्या मित्रांसह जवळच्या टेकडीवर गेला, एका गोठ्याजवळ संगणक बसवला आणि कामाला लागला.
येथूनच त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. त्याच्या ‘डूग्राफिक्स’ कंपनीच्या डिझाइन टेम्पलेट्सना देशभरात प्रसिद्धी मिळाली. हळूहळू त्यांची कहाणी व्हायरल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्याला “मेक इन इंडिया”शी जोडले. इथेच त्याने Canva कंपनी सुरु केली. दादासाहेब भगत यांची कंपनी कॅनव्हा सारख्या परदेशी साइट्सशी स्पर्धा करते. त्यांचे स्वप्न आहे की भारतीयांनी भारतीय सॉफ्टवेअरवर काम करावे आणि देशासाठी डिझाइन तयार करावे.
FAQ
1 दादासाहेब भगत हे कोण आहेत आणि त्यांचे सॉफ्टवेअर काय आहे?
दादासाहेब भगत हे पुण्यातील एका IT कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करणारे तरुण होते, ज्यांनी Canva ला टक्कर देणारे ‘डूग्राफिक्स’ नावचे फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर विकसित केले. हे सॉफ्टवेअर डिझाइन टेम्पलेट्सवर आधारित आहे आणि परदेशी साइट्सशी स्पर्धा करते.
2 दादासाहेब भगत यांचे गाव आणि पार्श्वभूमी काय आहे?
दादासाहेब भगत हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका छोट्या दुष्काळग्रस्त गावचे आहेत. शेती करणे कठीण होते आणि कुटुंबात शिक्षणाला महत्त्व नव्हते.
3 दादासाहेब यांचे शिक्षण आणि सुरुवातीचे करिअर कसे होते?
त्यांनी फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर ITI चा एक छोटासा अभ्यासक्रम केला. नोकरीच्या शोधात पुण्याला गेल्यानंतर त्यांना ४,००० रुपये महिन्याला नोकरी मिळाली. काही काळानंतर इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून ९,००० रुपये पगाराची नोकरी मिळाली, ज्यात साफसफाई, साहित्य वाहून नेणे आणि गेस्ट हाऊसमध्ये छोटी कामे करायची.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.