
Pune Crime Vanraj Andekar vs Govind Komkar: 5 संप्टेंबर 2025 रोजी पुणे शहरात सर्वत्र गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. असे असताना पुण्याच्या नाना पेठेत हत्येचा थरार पहायला मिळाला. पुण्यातल्या नाना पेठेतील आंदेकर टोळीनेफिल्मा गँगवार केले. . यात एका १९ वर्षीय तरुणाचा 3 गोळ्या घालून ठार केलं आहे. हा तरुण वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा आयुष कोमकर हा मुलगा होता. पुण्यातील आंदेकर टोळीने केलेल्या खळबळजनक हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
नाना पेठेत गँगवॉरमधून 17 वर्षाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. पुण्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्षभरापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा, गोळीबार तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह 16 आरोपींना अटक करण्यात आली होती. आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी त्याच्यावर गोळीबार झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हा खून घडवून आणल्याचा आरोप होतोय.
पोलिसांचा धक्कादायक खुलासा
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना वनराज आंदेकरचे वडील आणि मृताचे आजोबा बंधू आंदेकर यांच्यासह इतर नातेवाईकांनी आखली होती. पोलिसांना आंदेकर टोळी “बदलाच्या हत्येचा” कट रचत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. “क्राइम ब्रँचने आधीच आठ जणांना अटक केली होती. तथापि, कोणीतरी (बंधू आंदेकर) त्याच्याच नातवाला लक्ष्य करेल अशी कोणतीही ठोस माहिती नव्हती. सध्याच्या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि इतरांचा शोध सुरू आहे.” खुनाचा कट रचण्याचा प्रयत्न केला जात होता. गुन्हा शाखेने हे सगळं उघड केलं होत. पण एक व्यक्ती त्यांचेच नातवाचा खून करतील अशी कोणती माहिती मिळाली नव्हती. पण आता ही घटना घडलेली आहे या घटनेमध्ये जे जे आरोपी आहेत त्यांना परिणाम भोगायला लागणार काही आरोपींना यामध्ये अटक केली आहे राहिल्यांना पुढे अटक केली जाईल असे देखील ते म्हणाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा, गोळीबार तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह 16 आरोपींना अटक करण्यात आली होती. आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीत आला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी आरोपी अमन खान, यश पाटील हे सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते. आरोपींनी आयुष याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करुन खून केला. आयुषच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर, तसेच अन्य आरोपींनी रचला. त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांना मदत केली, असे कल्याणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.
FAQ
1. वनराज आंदेकर आणि गोविंद कोमकर हत्या प्रकरण काय आहे?
1 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यातील नाना पेठेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळीबार आणि कोयत्याने वार करून हत्या झाली. याचा बदला घेण्यासाठी 5 सप्टेंबर 2025 रोजी वनराज यांचा भाचा आणि हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर (19 वर्षे) याची नाना पेठेत गोळीबार करून हत्या करण्यात आली.
2. गोविंद कोमकरची हत्या कधी आणि कुठे झाली?
गोविंद उर्फ आयुष कोमकरची हत्या 5 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्यातील नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीच्या तळमजल्यावर झाली. तो दुचाकी पार्क करत असताना दोन आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला.
3. गोविंद कोमकरच्या हत्येमागील कारण काय होते?
पोलिसांच्या मते, गोविंद कोमकरची हत्या वनराज आंदेकर यांच्या 2024 मधील हत्येचा बदला घेण्यासाठी झाली. वनराज यांचे वडील आणि गोविंद यांचे आजोबा, बंडू आंदेकर यांच्या नेतृत्वाखालील आंदेकर टोळीने हा कट रचला
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.