
Maharashhtra ZP Election Results : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निकाल जाहीर झाले आहेत. पुण्याच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पुण्यात राष्ट्रवादीचा दबदबा कायम आहे. अजितदादांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचं काय होणार अशी चर्चा होती. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत पुणेकरांनी घड्याळाला उत्तम साथ दिली. पुणे झेडपीवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. सोबतच मावळ, आंबेगाव पंचायत समितीतही आपला झेंडा फडकवला आहे. मावळमधील सर्व 10 जागा राष्ट्रवादीने जिंकल्यात तर आंबेगावात 10 पैकी 8 जागा जिंकत आपला गड मजबूत केला आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पुण्यात मोठा फटका बसला होता. मात्र, झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार कमबॅक केले आहे.
अशी आहे पुणे जिल्ह्यातील निकालाची आकडेवारी
एकुण जागा – 73 पैकी 70 जागा निकाल
भाजप –10
शिवसेना –5
राष्ट्रवादी — 48
शरद पवार गट — 01
ठाकरे गट — 06
काँग्रेस — 00
अपक्ष — 00
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रचार न करता निवडून आलेत
बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रचार न करता निवडून आलेत. शिरूर ग्रामीण न्हावरा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिला.स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांचा राष्ट्रवादीच्या वृषाली वाळके यांनी पराभव केले.
खेड
समीर सुपे (राष्ट्रवादी – वाडा)
तनुजा घनवट (उबाठा – कडून)
दिप्ती भोगाडे (उबाठा – रेटवडी)
विजयसिंह शिंदे (उबाठा – पिंपळगाव)
गणेश अरगडे (उबाठा – मेदनकवाडी)
सुनीता बुटे (राष्ट्रवादी – पाईट)
गणेश बोत्रे (राष्ट्रवादी – नाणेकरवाडी)
विनया मुंगसे (उबाठा – कुरुळी)
आंबेगाव तालुका
विवेक वळसे पाटील (राष्ट्रवादी – पारगाव)
विष्णू काका हिंगे (राष्ट्रवादी – अवसरी बु.)
शीला राजेंद्र लोहोकरे (राष्ट्रवादी – शिनोली)
प्रीती प्रवीण थोरात (राष्ट्रवादी SP – कळंब)
सुवर्णा देविदास दरेकर (शिवसेना शिंदे गट – घोडेगाव)
दौंड आणि भोर
तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी – केडगाव बोरीपारधी): माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव विजयी.
राजेश बोडके (राष्ट्रवादी – भोलावडे गण)
प्रवीण जगदाळे (राष्ट्रवादी – भोलावडे-शिंद गट)
इंदापूर आणि मावळ
यशराज जगदाळे (राष्ट्रवादी – वडापुरी-माळवाडी): मोठ्या मताधिक्याने विजयी.
दिपाली गव्हाणे (राष्ट्रवादी SP – रांजणगाव सांडस तळेगाव): आमदार बापू पठारे यांच्या कन्या विजयी.
विद्या भुजबळ (भाजप – तळेगाव गण): विजयी.
पंचायत समितीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच पंचायत समित्यांचे निकालही जाहीर झाले आहेत. पुण्याच्या खेड पंचायत समितीत शिवसेना ठाकरे गटाने 12 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा जिंकल्या. मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 वर्षांपासूनची सत्ता अबाधित राखली आहे. इंदापूरमध्ये वडापुरी आणि माळवाडी गणातून यशराज जगदाळे, अर्चना खबाले आणि कल्पना पाटील या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली. भोरमध्ये भोलावडे गणातून राष्ट्रवादीचे राजेश बोडके विजयी झाले असून, एकंदरीत ग्रामीण भागातील स्थानिक गणांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



