
Pune Crime News : पिंपरी चिंचवडमध्ये पती- पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पोटगी मागितल्यानं पतीनं तीच्यावर जादूटोना केला आहे. चारित्र्याच्या संशयावरून भांडण होत असल्याने या पती पत्नीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिलेने कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केला होता. पोटगी मागितल्यानं पतीनं तीच्यावर अघोरी कृत्य केल्याचं केले आहे.
पिंपरी चिंचवडच्या विशाल नगर भागामध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेला पतीच्या अघोरी कृत्याचा सामना करावा लागला आहे. चारित्र्याचा संशय घेत असल्यामुळे सातत्याने होत असलेल्या भांडणांना कंटाळून महिलेने पतीपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केला. पीडित महिला विभक्त राहिला लागल्यानंतर पतीने राहत्या घरातील वस्तू दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास सुरुवात केल्याची माहिती पत्नीला मिळाली.
मुलांची वह्या पुस्तक आणि इतर काही साहित्य घेण्यासाठी पत्नी घरामध्ये गेली असता पतीने दरवाजा बंद करत पत्नीच्या गळ्याला कोयता लावत तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर हातामध्ये हळद-कुंकू घेऊन महिलेच्या गुप्तांगावर लिंबाच्या रस पिळत तुला वेडी करतो अशी धमकी दिली
याप्रकरणी पिंपरी चिंचवड मधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत पिढीतेला सहाय्य करण्याचं आवाहन त्यांनी केले. याप्रकरणी सांगवी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगली पोलीस त्याचा पुढील तपास करत आहे. पोलीस या गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई करतील ही पण अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला बाहेर काढायचं कसं हाच खरा प्रश्न आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.