
चंद्रकांत फुंडे, झी 24 तास, पुणे: उद्या वरळीमध्ये ठाकरेंटी शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन पक्षांचा विजयी मेळावा होतोय. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या दृष्टीकोनातून या मेळाव्याकडे पाहिले जात आहे. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र आले तर पुणे पालिकेतही सत्तेची समिकरणं बदलू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे या दोन्ही पक्षांची ताकद आणि त्यांचे एकत्र येण्याच्या शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पुण्यात दोघांची ताकद कशी आहे? जाणून घेऊया.
2017 पुणे मनपा निवडणुकीत शिवसेनेचे 10 नगरसेवक तर मनसेचे 2 निवडून आले होते. पण 2022 साली शिवसेना फुटल्याने नाना भानगिरे हे हडपसर भागातले एकमेव नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. यानंतर गेल्या 2 महिन्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 नगरसेवक हे भाजपात गेले तर मनसेचे वसंत मोरे हे ठाकरेंच्या शिवसेनेत आले. म्हणजेच आजच्या घडीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे 3+1 असे 4 नगरसेवक उरलेत. तर मनसेकडे सध्या शहराध्यक्ष साईनात बाबर हे एकमेव नगरसेवक आहेतय
दरम्यान 2017 साली सेना 30 जागी तर मनसे 16 जागी दुसऱ्या स्थानी राहिली होती. पुणे शहरात उबाठा शिवसेनेचे 5 नगरसेवक भाजपात गेले असले तरी कसबा, वडगावशेरी, हडपसर, खडकवासला याभागातले शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत राहतील असा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे. तर मनसेचीही कोंढवा, कसबा, शिवाजीनगर, खडकवासला आणि कोथरूडमधे राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर कार्यरत आहेत.
शिवसेनेला अधिक व्यापक जनाधार आणि मजबूत संघटना आहे तर मनसे तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. हिंदी भाषा सक्तीविरोधी आंदोलनामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता वाढलीय. ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो.आगामी पुणे मनपा निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू जर खरोखरच एकञित निवडणुका लढले तर या दोन्ही पक्षांना चांगला फायदा होऊ शकतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.