digital products downloads

पुण्यात तरुणावर गोळीबार, एक गंभीर जखमी: वडगाव बुद्रुकमध्ये पूर्ववैमनस्यातून हल्ला; आरोपींचा शोध सुरू – Pune News

पुण्यात तरुणावर गोळीबार, एक गंभीर जखमी:  वडगाव बुद्रुकमध्ये पूर्ववैमनस्यातून हल्ला; आरोपींचा शोध सुरू – Pune News



पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चरवड वस्तीमधील एका मोकळ्या मैदानात हा प्रकार घडला. या हल्ल्यात सुरज गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज गायकवाड आपल्या मित्रासह वडगाव बुद्रुक येथील चरवड वस्ती परिसरातील एका मोकळ्या मैदानात थांबला होता. त्यावेळी सोहम खामकर, आर्यन जोगडे, मनोज गीते, प्रेम जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्याला गाठले. जुन्या वादाचे निमित्त करून या टोळक्याने प्रथम सुरज आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असतानाच, टोळक्यातील एकाने पिस्तूल काढून सुरजवर थेट गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. सोहम खामकर, आर्यन जोगडे, मनोज गीते आणि प्रेम जाधव यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. जखमी तरुणाच्या मित्राचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp