
Shehzad Poonawalla Mother Hit and Run: पुण्यात भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कार चालकाने उडवलं आहे. सीएनजी पंपावर रात्री हा सगळा प्रकार रात्री घडला. धडकेनंतर कारचालक फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. दरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या शहजाज पुनावाला यांच्या आईवर उपचार सुरु आहेत. गाडीने जाणूनबुजून त्यांच्या आईला धडक दिली असा त्यांचा आरोप आहे.
पूनावाला यांच्या म्हणण्यानुसार, एका अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आपल्या वाहनाने त्यांच्या आईला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळून गेला. अपघातात आई गंभीर जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आईवर लवकरच शस्त्रक्रिया होणार असून, त्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.
‘एक्स’वर या घटनेची माहिती देताना, पूनावाला यांनी या कृत्याला हेतुपुरस्सर आणि अत्यंत त्रासदायक असे म्हटलं आहे. त्यांनी लिहिले की, काही तासांपूर्वी त्यांच्या आईला एका गाडीने धडक दिली, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत आणि त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.
#WATCH | Pune | BJP National Spokesperson Shehzad Poonawalla says, “Yesterday, a very unfortunate and disturbing incident took place with my mother, when a car driver knocked down my mother, who has suffered injuries, given her advanced age of 74-75. Today, the doctors have said… pic.twitter.com/3bX5aTVwNU
— ANI (@ANI) February 4, 2026
दुःख व्यक्त करताना भाजप प्रवक्त्याने सांगितले की, या घटनेने त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे आणि त्यांनी आपल्या आईचे वर्णन एक दयाळू आणि प्रेमळ व्यक्ती म्हणून केले. ते म्हणाले की, या वयात आपल्या आईला अशा हिंसेला सामोरे जाताना पाहणे हे हृदयद्रावक आणि संतापजनक आहे.
WTF is going on ? My mom a senior citizen went for a drive with my driver and executive assistant & was waiting on the side while they were tanking up the gas in our car, someone just hit her (seems deliberate) and ran away ! Really wtf . @Shehzad_Ind @PuneCityPolice pic.twitter.com/rvR95r2u5l
— Tehseen Poonawalla Official (@tehseenp) February 3, 2026
पोस्ट्ससोबत, पूनावाला यांनी रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांची आई रुग्णलयात दिसत आहे.
चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
शहजाद पूनावाला यांनी एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी माझ्या आईला धडक देणाऱ्या गाडीच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते यामागील हेतू शोधून काढतील. तो जाणूनबुजून केलेला अपघात होता, मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे झाला, धडक देऊन पळून जाण्याचा प्रकार होता की आणखी काही हे पोलीस बाहेर काढतील. मी त्याचे तपशील येथे शेअर करत नाही, कारण मला त्याच्यावर ऑनलाइन टीकेची झोड उठवायची नाही.
#WATCH | Pune | BJP National Spokesperson Shehzad Poonawalla says, “Yesterday, a very unfortunate and disturbing incident took place with my mother, when a car driver knocked down my mother, who has suffered injuries, given her advanced age of 74-75. Today, the doctors have said… pic.twitter.com/3bX5aTVwNU
— ANI (@ANI) February 4, 2026
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, “काल माझ्या आईसोबत एक अत्यंत दुर्दैवी आणि त्रासदायक घटना घडली, जेव्हा एका कार चालकाने त्यांना धडक दिली. 74 ते 75 वर्षांची असल्याने माझ्या आईला दुखापत झाली आहे. आज डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांच्यावर हिपची शस्त्रक्रिया करावी लागेल. ही बाब आणखी त्रासदायक होती की, ज्या व्यक्तीने कारने धडक दिली, तो घटनास्थळावरून पळून गेला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज माझ्याशी संपर्क साधला आणि माझ्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे की, पोलिसांना तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी माझ्या आईचा जबाब नोंदवला आहे. मला पुणे पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी वेळ काढल्याबद्दल आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानू इच्छितो. मला खात्री आहे की पुणे पोलीस या घटनेच्या मुळाशी जातील.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



