
Pune Mundhwa Pub Issue: पुण्यामध्ये साधारण वर्षभरापूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर सर्वच बार आणि पब्सची तपासणी करण्यात करुन बेकायदेशीर, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बार आणि पबवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र आता ही मोहीम थंड पडली आहे की काय असा सवाल स्थानिकांकडून विचारला जात आहे. यामागील कारण म्हणजे मागील काही काळापासून पुण्यातील स्थानिकांना या बार संस्कृतीचा नाहफ फटरा बसत असून त्रास सहन करावा लागतोय. असाच काहीसा प्रकार रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्रीदरम्यान मुंढाव्यात घडला. या ठिकाणी पबमधील गोंधळावरुन एवढा राडा झाला की स्थानिकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
नेमकं घडलं काय?
मुंढव्यातील पबमध्ये मद्यधुंदावस्थेतील ग्राहकाने रस्त्यावर बिअरच्या बाटल्या फोडल्या. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने दारुच्या नशेत एका स्थानिकाला मारहाण केली. या साऱ्या प्रकारामुळे स्थानिक चांगलेच खवळले. संपूर्ण प्रकार ‘स्वे ऑल डे बार’ नावाच्या पबसमोरच घडली.
घडलेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी स्थानिक रहिवासी बार चालकाकडे गेले असता मुजोर मालकाने स्थानिक रहिवाशांनाच दमबाजी केल्याने रहिवासी चिडले. स्थानिकांनी एकत्र येत हा पब बंद पाडला. माजी नगरसेविका गौरी पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत हा पब बंद पाडला. पोलिसांनी वेळीच या ठिकाणी धाव घेत स्थानिकांना गेटवरच रोखून धरल्याने पबची तोडफोड वाचली. अखेर पोलिसांनी हॉटेल तात्पुरते रिकामं करून रहिवासांना शांत केलं
थेट पोलीस स्टेशनला पोहचले स्थानिक
दारुड्यांचा नाहक ञास आणि पब चालकाच्या दमबाजीविरोधात पिंगळे वस्तीतले रहिवाशांचा उद्रेक झाल्याचं रात्री पाहायला मिळालं. हा पब कायमचा बंद करण्याची आग्रही मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. सततच्या त्रासाला वैतागलेले रहिवासी रात्रीच थेट मुंढवा पोलीस स्टेशनला पोहोचले. स्थानिकांच्या रेट्यामुळे पोलिसांनी हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
FAQ
पुण्यातील पब आणि बार संस्कृतीबाबत स्थानिकांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत?
पुण्यातील स्थानिकांना पब आणि बारमधील गोंधळ, दारुड्यांचा त्रास, आणि नियमांचे उल्लंघन यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे आणि ते या पब संस्कृतीला कंटाळले आहेत.
मुंढव्यात रविवार-सोमवारच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं?
मुंढव्यातील ‘स्वे ऑल डे बार’ पबसमोर एका मद्यधुंद ग्राहकाने रस्त्यावर बिअरच्या बाटल्या फोडल्या आणि एका स्थानिकाला मारहाण केली. यामुळे स्थानिक संतप्त झाले आणि त्यांनी पब बंद पाडण्यासाठी आंदोलन केलं.
स्थानिकांनी कशी प्रतिक्रिया दिली?
स्थानिकांनी माजी नगरसेविका गौरी पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आणि पब बंद पाडला. तसेच, ते रात्री थेट मुंढवा पोलीस स्टेशनला पोहोचले आणि पब कायमचा बंद करण्याची मागणी केली.
पोलिसांनी याप्रकरणी काय कारवाई केली?
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत स्थानिकांना पबच्या गेटवर रोखलं, ज्यामुळे पबची तोडफोड टळली. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
स्थानिकांची मुख्य मागणी काय आहे?
स्थानिकांनी ‘स्वे ऑल डे बार’ हा पब कायमचा बंद करण्याची आग्रही मागणी केली आहे, कारण त्यांना सततच्या गोंधळामुळे आणि दारुड्यांच्या त्रासाला वैताग आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.