
Pune Crime News : पुण्यातील एका मोठ्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पुण्यात हत्या झालेल्या महिलेचा मृतदहे इंदापूर पासून 300 किलोमीटर अंतरावर नाशिकच्या नांदगाव घाटात सापडला. या प्रकरणातील खरा आरोपी सापडल्यावर पोलिसही चक्रावले.
पुण्याच्या इंदापूर मध्ये धक्कादायक अशी घटना घडली. पत्नीच्या चारित्रावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळत तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह इंदापूर पासून जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील घाटात सुमारे दीडशे फुट खोल फेकला. यानंतर या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला.
इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी येथील प्रियंका शिवाजी चितळकर हिचा 2013 साली इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील ज्योतीराम करे याच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांना दोन अपत्य ही झाली. दरम्यान मागील काही महिन्यांपासून ज्योतीराम करे याचा पत्नी प्रियंकाच्या चरित्रावर संशय होता.यातून दोघात वाद असायचे. त्यानंतर 29 जानेवारी 2025 रोजी ज्योतीराम करे यानं इंदापूर पोलिसात आपली बायको हरवण्याची तक्रार दाखल केली होती.
प्रियंका करे हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर इंदापूर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, ही महिला हरवली नाही तर तिचा खून झाला असावा असा संशय इंदापूर पोलिसांना वाढला आणि पोलिसांनी त्या दृष्टीने आपली पावलं टाकली. ज्योतीराम करे हा सातत्याने पोलिसांना बनवण्याचा प्रयत्न करत होता.
शेवटी पोलिसांपुढे त्याचं काही चाललं नाही, पोलीस त्याला घेऊन नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगर घाटात पोहचले आणि तब्बल दीडशे फूट खोल दरीत फेकलेला कुजलेल्या अवस्थेतील प्रियंका सांगाडा पोलिसांनी बाहेर काढला. ज्योतीराम करे हा साखर कारखान्याला ऊस पुरवठा कामी ट्रॅक्टर चालवतो. त्यामुळे त्याला या परिसराची चांगली माहिती होती. हे हत्याकांड करण्यापूर्वी त्याने या भागाची जणू काय रेखीच केली होती. आपल्या आणखी एका मित्राच्या सहाय्याने त्याने नांदगावच्या डोंगरदरीत प्रियंकाचा मृतदेह फेकला.
प्रियंकाचा शोध लावणं हे इंदापूर पोलिसांसमोर एक कडवं आव्हान होतं, मात्र तीन महिन्यानंतर पोलिसांनी प्रियंका हरवली नाही तर तिची हत्या झालीय याचा तपास लावला आणि थेट प्रियंकाचा सांगाडाच पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी ज्योतीराम करे आणि दत्तात्रय गोलांडे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.