
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तर वाहने अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाल
.
दिवे घाटात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे निसर्गाचा रौद्र अवतार दिसून आला. घाटमाथ्यावर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून ओढे आणि नाल्यांसारखे पाणी वाहत होते. माती, गोटे आणि दगड रस्त्यांवर आले होते. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
आय बी गेस्ट हाऊसमध्ये शिरले पाणी
पुणे शहरातील एक महत्त्वाची शासकीय इमारत असलेल्या आय बी गेस्ट हाऊसला देखील पावसाचा फटका बसला. सायंकाळच्या सुमारास पडलेल्या जोरदार पावसामुळे या इमारतीच्या जिन्यांपर्यंत पाणी साचले होते. यामुळे आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या निवास व्यवस्थेवर परिणाम झाला. गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी बादल्या आणि झाडूंच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी चिंचवडमध्ये चारचाकी वाहने वाहून गेली
पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळच्या वेळेस 6:30 ते 7:15 आणि पुन्हा रात्री 9 ते 9:30 दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे चऱ्होली परिसरातील ओढे ओसंडून वाहू लागले आणि यामध्ये चार ते पाच वाहने पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहून गेली. अग्निशमन दलाने मदतीने क्रेनच्या साह्याने ही वाहने बाहेर काढली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नालेसफाईचे दावे ठरले फोल
काल रात्रीच्या पावसामुळे खंडोबामाळ ते थरमॅक्स चौक या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे दावे केले असले, तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर पाणी साचल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दाव्यांचे पितळ उघडे पडले आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी हळूहळू ओसरू लागले आहे.
हे ही वाचा…
पुण्यात पावसामुळे 20 ठिकाणी झाडे कोसळली:नवले पूल परिसरात 65 वर्षीय महिला नाल्यात वाहून गेली, शोधकार्य सुरू
पुणे शहर, परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे २० झाडे कोसळल्याची घटना घडली. तर मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर गुरुवारी रात्री नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेल्याची घटना घडली. नाल्यात वाहून गेलेल्या महिलेचा शोध लागलेला नाही. अग्निशमन दलाकडून महिलेचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत महिलेचा शोध लागला नाही. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.