
चंद्रकांत फुंदे, (प्रतिनिधी) पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी हगवणे कुटुंब सध्या अटकेत आहे. या प्रकरणाच्या तपासात हगवणेंनी खोटे पत्ते दाखवून शस्त्र परवाना मिळवल्याचं उघड झालं आहे. दरम्यान पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक शस्र परवाना वाटप झाल्याची माहिती आहे. गेल्या पाच वर्षात पुण्यात शस्त्र परवान्यांची अक्षरश: खैरात वाटल्याचं दिसतं आहे.
वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी पुण्यातील हगवणे कुटुंब सध्या जेलची हवा खातं आहे. त्यांचे अनेक कारनामे समोर येत असताना हगवणेंनी शस्त्रपरवाना कसा मिळवला हेही समोर आलाय..शशांक आणि सुशील हगवणे यांनी बनावट घरभाडे करार दाखवून शस्र परवाने मिळवल्याचं उघड झालं आहे. महत्वाच या दोघांना फक्त सव्वा महिन्याच्या कालावधीत शस्त्र परवाना मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामागे त्यांचा मामा, जालिंदर सुपेकर यांच्या प्रभावामुळे कोणताही अडथळा आला नसल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या प्रकरणामुळे हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देताना खास ट्रीटमेंट मिळाल्याची शंका व्यक्त होत आहे.
कोणत्या साली किती शस्र परवाने दिले गेले?
साल शस्रपरवाने रद्द
2021 152 0
2022 279 0
2023 186 42
2024 23 111
गेल्या पाच वर्षात पुण्यात अगदी शस्त्र परवान्यांची खैरात वाटल्याचं दिसतं आहे. शस्त्र परवान्यासाठी पोलिस आयुक्तांची अंतिम सही असते.
हेही वाचा : Success Story: इंजिनीअरिंग सोडून सुरु केला व्यवसाय, पुण्याच्या सुष्मिताने ‘अशी’ केली 50 लाखांची कमाई!
गेल्या 5 वर्षातील पुण्याचे सीपी कोण?
अमिताभ गुप्ता
20 सप्टेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2022
रितेश कुमार
18 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2024
अमितेश कुमार
31 जानेवारी 2024 पासून पुढे
हगवणे कुटुंबाच्या शस्त्र परवान्याच्या प्रकरणानंतर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोगस शस्र परवाने वाटपाच्या चौकशी संकेत दिलेत. तर कोणा कोणाला शस्त्र परवाने दिले गेलेत याची पोलिसांनी संकेतस्थळावर माहिती द्यावी अशी मागणी सामाजिक काय़र्कर्ते विजय कुंभार यानी केलीये. या खिरापत टाईप शस्र परवाने वाटपाची कसून चौकशीची मागणी आता जोर धरू लागलीये. त्यामुळे मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यताही आहे. हगवणे कुटुंबाने बनावट पत्ते दाखवून शस्र परवाने मिळवले…त्यानंतर हि सगळी घटना घडली. आता पुण्यातील शस्त्र परवान्यांची खैरात थांबवण्यासाठी गृह विभाग काय पावलं उचलणार हे पाहावं लागणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.