digital products downloads

पुण्यात शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून भव्य मानवंदना: शिवजयंती महोत्सव समिती पुणेतर्फे भव्य सोहळ्याचे आयोजन – Pune News

पुण्यात शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून भव्य मानवंदना:  शिवजयंती महोत्सव समिती पुणेतर्फे भव्य सोहळ्याचे आयोजन – Pune News



पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीने आयोजित केलेल्या स्वराज्यरथ सोहळ्यात शिवशाही अवतरली. सरदारांच्या वंशजांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना भव्य मानवंदना देण्यात आली. या सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेतील लाखो शिवभक्तांनी ‘जय शिवाजी जय भवानी’चा जयघोष केला. तिरुपती बालाजीच्या फुलांनी सजवलेला जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ, त्यानंतर ९६ स्फूर्तिदायक स्वराज्यरथ, महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींचे मर्दानी खेळ, ५१ रणशिंगांची ललकारी आणि नादब्रह्म ट्रस्ट ढोल ताशा पथकाचा रणगजर हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. सनई-चौघड्यांच्या मंगलमय सुरांनी वातावरण भारले होते. शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन लालमहाल येथून करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, आमदार हेमंत रासने आणि सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. यंदा या मिरवणुकीचे १४ वे वर्ष होते. यावेळी ५१ रणरागिणींच्या औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथकाने शिवकालीन युद्धकला सादर केली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या जल्लोषपूर्ण वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ईशान अमित गायकवाड यांनी सलग १५ व्या वर्षी ही पुष्पवृष्टी केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकावर शिवरायांचे संस्कार लहानपणीच होतात आणि शिवरायांच्या पहिल्या स्मारकावर सलग १३ वर्षे पुष्पवृष्टी करणे हे माझे परमभाग्य आहे. हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीचे संकल्पक अमित गायकवाड यांनी स्मारकाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. करवीर संस्थानाचे राजर्षी शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी हे स्मारक पुण्यात उभारले. १६ जून १९२८ रोजी अनावरण झालेल्या या स्मारकातील पुतळा एकसंध ओतीव कामाचा असून, त्याचे वजन तब्बल ८ हजार किलो आहे. हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा असल्याचे त्यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp