
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस १७ सप्टेंबरला देशभरात सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दि. १६ रोजी पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा हजारो ड्रोन शोसह दिव
.
मोहोळ म्हणाले,थ्रीडी स्वरूपात असलेला हा ड्रोन लाईट शो ४५ मिनिटे असेल. त्यात मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूंचे दर्शनही पुणेकरांना घडेल. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकसित भारताचा संकल्पही याद्वारे पुणेकरांना अनुभवता येईल. हजारो ड्रोन्स जेव्हा अवकाशात झेपावतील, तेव्हा पुण्याच्या ३-४ किलोमीटर परिसरापर्यंतच्या भागातील नागरिकांना हा शो अवकाशात पाहता येणार आहे. मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हजारो ड्रोन पुण्याच्या अवकाशात झेपावतील आणि त्यांच्या विविध फॉर्मेशन्समधून विकसित भारताच्या दिशेने झालेल्या प्रवासाचे नयनरम्य दर्शन पुणेकरांना घडेल.पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्डद्वारे शुभेच्छा देणार आहेत. यात पुणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिलेले शुभेच्छा संदेश एकत्र करुन थेट पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यात येणार आहेत.
मंगळवार दि. १६ सप्टेंबर या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० आवश्यक साहित्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. शिबिरानंतर याच ठिकाणी सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत ख्यातनाम संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट होईल. दरम्यान रात्री ८ वाजता ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा ऐतिहासिक ड्रोन शो होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.