digital products downloads

पुण्यानंतर महाष्ट्रातील ‘या’ शहरात निर्माण होणारे विद्येचे दुसर माहेरघर! भारतातील सर्वात मोठी एज्युसिटी, एकाच कॅम्पसमध्ये 10 इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी

पुण्यानंतर महाष्ट्रातील ‘या’ शहरात निर्माण होणारे विद्येचे दुसर माहेरघर! भारतातील सर्वात मोठी एज्युसिटी, एकाच कॅम्पसमध्ये 10 इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी

CIDCO International Education Centre In Navi Mumbai : पुणे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आता महाराष्ट्रातील दुसरे  विद्येचे दुसर माहेरघर नवी मुंबईत सुरु होणार आहे. नवी मुंबई जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) अंतर्गत अंदाजे 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. एकात्मिक आरोग्यविषयक व शैक्षणिक सुविधा, आंतरराष्ट्रीय मानकांचे क्रीडा संकुल व कौशल्य केंद्र उभारण्याच्या प्रमुख उद्देशाने उत्कृष्टता केंद्र हा प्रकल्प सिडकोतर्फे विकसित करण्यात येत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

या प्रकल्पाकरिता जमीन विकसित करण्याच्या कामाला गती देण्यात आली असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. “आंतरराष्ट्रीय एज्युसिटी हा देशामध्ये शैक्षणिक क्रांती घडवणारा प्रकल्प असून याद्वारे देशातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी विद्यापीठे आणि नामांकित शिक्षणतज्ज्ञांकडून शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या केंद्रामुळे बहुसांस्कृतिक आदानप्रदान आणि संशोधन यांना चालना मिळणार आहे. नियोजित वेळेत एज्युसिटी प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. आंतरराष्ट्रीय एज्युसिटी एक ऐतिहासिक उपक्रम असून ज्यामध्ये एकाच ठिकाणी एकाच कॅम्पसमध्ये 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सामील असतील. हा देशातील अशा प्रकारचा एकमेव उपक्रम ठरेल.”

14 जून 2025 रोजी सिडको, महाराष्ट्र शासन आणि यॉर्क विद्यापीठ, ॲबरडीन विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉइस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयईडी विद्यापीठ या पाच नामांकित परदेशी विद्यापीठांदरम्यान सामंजस्य करारनामा करण्यात येऊन नवी मुंबईमध्ये कॅम्पस स्थापन करण्याकरिता या विद्यापीठांना इरादापत्रे प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, सिडकोच्या एज्युसिटी उपक्रमांतर्गत नवी मुंबईमध्ये जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस स्थापन करण्यात येणार आहेत. कुंडेवहाळ येथे सुमारे 100 हेक्टरवर एज्युसिटी विकसित करण्यात येत आहे.

ही एज्युसिटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 3 ते 4 किमीच्या परिघात वसलेली आहे. या व्यतिरिक्त मल्टिमोडल कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यांद्वारे देखील कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. मुंबईहून वाहनाद्वारे एज्युसिटी एक तासाच्या अंतरावर असून एरोसिटी, नैना शहर, खारघर कार्पोरेट पार्क, गोल्फ कोर्स व पनवेल महानगरपालिका क्षेत्रापासूनही नजीकच्या अंतरावर आहे. 

एज्युसिटीकरिता देण्यात आलेली जमीनीच्या सपाटीकरणाचे काम आवश्यक असून जमिनींचे सुलभरीत्या वाटप करता यावे म्हणून चार स्वतंत्र भूखंडांवर भूविकासाचे काम करण्यात येणार आहे. सिडकोतर्फे भाग-1व भाग-2 मधील 50 हेक्टर जमिनीच्या विकासासह 45 मी. x30 मी. रुंद प्रवेश मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून ई-निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर 45 मी. रुंद मार्गाद्वारे राष्ट्रीय महामार्ग 348 (राष्ट्रीय महामार्ग 4बी) जेएनपीटी वरून एज्युसिटी येथे थेट प्रवेश मिळणार आहे. त्याचप्रमाणे सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पनवेल रेल्वे स्थानक जोडणारी मेट्रो लाईन एम- २४ ची योजना आखत आहे, जी नैना क्षेत्रापर्यंत विस्तारेल आणि प्रस्तावित एरोसिटी आणि एज्युसिटीला देखील जोडेल.

FAQ

प्रश्न १: नवी मुंबईत CIDCO कडून कोणता मोठा शैक्षणिक प्रकल्प विकसित होत आहे?
उत्तर: सिडकोतर्फे पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे सुमारे १०० हेक्टरवर “आंतरराष्ट्रीय एज्युसिटी” (International EduCity) हा जागतिक दर्जाचा शिक्षण हब विकसित करण्यात येत आहे. हा देशातील अशा प्रकारचा एकमेव प्रकल्प असेल ज्यात एकाच कॅम्पसमध्ये १० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येतील.

प्रश्न २: या एज्युसिटीचे प्रमुख उद्देश काय आहेत?
उत्तर: देशातील विद्यार्थ्यांना परदेशात न जाता आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि नामांकित तज्ज्ञांकडून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे, बहुसांस्कृतिक आदानप्रदान व संशोधनाला चालना देणे, एकात्मिक आरोग्य सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आणि कौशल्य विकास केंद्र उभारणे.

प्रश्न ३: आतापर्यंत कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर करार झाले आहेत?
उत्तर: १४ जून २०२५ रोजी खालील पाच नामांकित परदेशी विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार (MoU) झाले आहेत आणि त्यांना इरादापत्र (LoI) देण्यात आले आहेत:
• यॉर्क विद्यापीठ (York University)
• ॲबरडीन विद्यापीठ (University of Aberdeen)
• वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ (University of Western Australia)
• इलिनॉइस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Illinois Institute of Technology)
• आयईडी विद्यापीठ (IED University)

 

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp