digital products downloads

पुण्याला काळीमा फासणारी घटना! महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच बुधवार पेठेतील कुंटखान्यात…

पुण्याला काळीमा फासणारी घटना! महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच बुधवार पेठेतील कुंटखान्यात…

Pune Crime News: राज्यात दिवसोंदिवस महिलांविरोधातील गुन्हेगारी वाढत असतानाच विद्येचं माहेर घर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मदतीसाठी स्वतः पोलिस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला महिला पोलिस कर्मचाऱ्यानेच पुन्हा पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर माहिती समोर येताच संबंधित महिला पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source

नेमकं घडलं काय?

सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली होती. मात्र, मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलिस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नेले.

दोघींमध्ये संशयास्पद बोलणी

ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला शुक्रवार पेठ पोलिस चौकीत बोलावण्यात आले. त्यानंतर महिला पोलिस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये समोर आले आहे.

निलंबित केलेली महिला कोण?

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता महिला पोलिस हवालदाराने कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले.

आदेशात काय म्हटलं आहे?

परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. “अत्यंत बेजबाबदारपणे कर्तव्य बजावून शिस्तप्रिय पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली,” असे कृषिकेश रावले यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांची छापेमारी

दरम्यान, पुण्यातील बुधवार पेठेतील अनेक घरांची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतल्याचं दिसून आलं. अमली पदार्थांसह, जबरदस्तीने अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसायावर धाडी टाकण्याचा या कारवाईचा मानस होता. बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्ली बाहेर नाकाबंदी करुन 50 पेक्षा अधिक घरांची झडती घेण्यात आली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp