
पुण्यावरून अमरावती जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर पहाटेच्या ५ वाजताचे सुमारास भीषण अपघात झाला. चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता असून, या अपघातात घटनास्थळावर एक व्यक्ती ठार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जख
.
घटनेची माहिती शेलूबाजार येथील सामाजीक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे यांना मिळताच त्यांनी आमदार शाम खोडे यांना कळवली. तत्काळ आमदार खोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना घटनास्थळाबद्दल माहिती देवून मदतीच्या सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच १४ एच.जी ६६६७ ही नागपुर लेन वरून जात होती. यावेळी चॅनल क्र. २१५ चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे किंवा नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता असून, या अपघातात घटनास्थळावर एक व्यक्ती ठार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये २० ते २५ किरकोळ जखमी असून अती गंभीर ४ ते ५ जखमी असल्याचे समजते. जखमींना विविध रुग्णवाहिकेद्वारे कारंजा, शेलूबाजार आणि अकोला येथे हलवण्यात आले असून, पुढील तपासात अपघाताचे नेमके कारण उलगडण्याची कामगिरी सुरू आहे.
यावेळी मदत कार्यात शेलूबाजार येथील पांडुरंग कोठाळे आणि साईश्रध्दा योगा ग्रुप तसेच वनोजा येथील आदीत्य इंगोले, शुभम हेकड, गोपाल राऊत, कारंजा येथील मदती करिता सर्वधर्म आपत्कालीन संस्थेची रुग्णवाहिका गुरु मंदिर संस्थेची रुग्णवाहिका आणि संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेची रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहोचली होती. यात सर्व धर्म मित्रमंडळाचे श्याम सवाई गुरु मंदिर संस्थानचे रमेश देशमुख संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्थेचे शिवम खोंड सास शोध पथक दीपक सोनवणे छोट्या उईके संत गाडगेबाबा शोध व बचाव पथक चे अतुल उमाळे गोपाल गिरी व टीम घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती मदत केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मंगरूळपीर तहसीलदार शितल बंडगर, ठाणेदार सुधाकर आढे व पीएसआय दिनकर राठोड यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.

आमदार शामभाऊ खोडे यांची तत्पर भेट
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातस्थळी आमदार शामभाऊ खोडे यांनी भेट दिली. या अपघातामुळे अनेक प्रवासी जखमी झाले असून, मदत कार्याची आवश्यकता ओळखून, घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वीच आमदार खोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना आवश्यक माहिती देवून तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार स्थानिक प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरू केली असून, जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे तत्परतेने कारंजा, शेलूबाजार आणि अकोला येथे हलवण्यात आले आहे. आमदार खोडे यांची तत्परता आणि प्रशासनाशी समन्वय यामुळे या गंभीर प्रसंगात आवश्यक ती मदत वेळेवर पोहोचली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.