
Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात वातावरण पेटल. याप्रकरणी वाल्मिक कराडला दोषी आढळला जो सध्या तुरुंगावस भोगतोय. वाल्मिक हा धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याने त्यांच्यावरही गभीर आरोप झाले. दरम्यान धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत आले आहेत. नागपूरमधील एका महिलेने त्यांच्यावर खूप गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काय नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
मुख्य आरोप काय आहेत?
रंजना नागपूरकर यांनी धनंजय मुंडे, कैलास फड आणि निखील फड यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केलाय. त्यांच्या पतीला सरकारी नोकरीत पुन्हा रुजू करून घेण्यासाठी मुंडे यांनी पैसे मागितले. ‘मी एकूण 17 लाख रुपये दिले. प्रथम परळीतील मुंडे यांच्या घरी गेल्या तेव्हा मुंडे यांनी सांगितलं, “जा, तुमचं काम आता पूर्ण झालं आहे.” पण नंतर ना पतीची नोकरी मिळाली, ना पैसे परत मिळाले’, असे त्या म्हणाल्या.
‘पैसे परत मागितल्यावर…’
‘ मी पुन्हा पैसे मागायला परळीतील घरात गेले. तेव्हा तिथे धनंजय मुंडे, कैलास फड, निखील फड यांच्यासोबत मुंडे यांच्या पत्नी आणि आईही उपस्थित होत्या. त्यावेळी मुंडे यांच्यासमोरच माझ्या मानेवर पिस्तूल लावून भीती घातल्याचा खळबळजन आरोप त्यांनी केला. “तू पुन्हा आलीस तर तुला गाडून टाकू, कुणालाही कळणारही नाही”, अशी धमकी मला देण्यात आली. या धमकीनंतर रंजना यांनी त्यांच्या बंगल्यावर जाणं बंद केल्याचे रंजना म्हणाल्या.
प्रकरण कसं समोर आलं?
मंगळवारी 18 फेब्रुवारी 2026 रोजी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या घरी रंजना नागपूरकर रडत-रडत आल्या. मुंडे यांच्या मानसिक छळामुळे रंजनाताईंच्या पतीचा मृत्यू झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्यांनी मुंडे यांच्यावर आणखी 22 हून अधिक तक्रारी असल्याचंही उघड केलं आणि “शहाणा हो, माझ्याशी पंगा घेऊ नकोस.” असा इशारा मुंडे यांना दिला.
‘मुंडे साहेबांचं नाव घेऊन..’
धनंजय मुंडे यांचे समर्थक अविनाश नाईकवडे यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. ते म्हणतात, “महाराष्ट्रात अनेक लोक मुंडे साहेबांचं नाव घेऊन स्वतःचा धंदा चालवतात. पैसे दिले असतील तर ते मुंडे यांना दिले नाहीत. रंजनाताई, तुम्ही बीडला या, आम्ही सत्य तपासू.” असे आव्हान त्यांनी रंजना यांना दिलं.
धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत?
हा प्रकार धनंजय मुंडे यांच्यासाठी नवीन अडचण बनला आहे. रंजना यांच्या रडण्यानं आणि जरांगे पाटील यांच्या बोलण्यानं प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. सध्या राजकीय चर्चा जोरात सुरू आहे. कुणीही याची चौकशी करावी की नाही, याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही. पण महिलेच्या मनस्तापाची आणि आर्थिक नुकसानीची कहाणी लोकांमध्ये चर्चेचा विषय झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



