
Eknath Shinde Dasara Melava 2025 Live : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज मुंबईत पार पडत आहे. राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. बाळासाहेबांनी दिलेला मंत्र आम्ही कधीच सोडणार नाही. अनेक शिवसैनिक शेतकऱ्यांना मदत करत आहेत. मदतीचे धोरण हेच शिवसेनेचे धोरण आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट येते तेव्हा शिवसैनिक धावून जात असतात.
महापुरामुळे बळीराजा पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. हे शेतकऱ्यांचं संकट मोठं आहे. शेतकऱ्यांनी सांगितलं की यापूर्वी आम्ही कधीच ऐवढा मोठा पाऊस पाहिला नाही. त्यामुळे या मेळाव्यामध्ये जवळचे लोक बोलावले. बाकीचे लोक शेतकऱ्यांना मदत करत आहेत.
यंदाच्या दसऱ्यावर पुराचं सावट
दसरा असेन मोठा आनंदाला नाही तोटा. पण यंदाच्या दसरा मेळाव्यावर पूराचे सावट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याचे काम शिवसेना करत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी देखील शिवसैनिकांची पाठ थोपटली असती. शिवसेना आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलं. माझी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे. धीर सोडू नका टोकाचं पाऊल उचलू नका. तुमचं जीवन उद्धवस्त झालं आहे ते उभ करण्याच काम शिवसेना करणार आहे.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मी देखील एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे दिवाळीच्या पूर्वीच शेतकऱ्यांना मदत केली जाईल. हा एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे.
व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा मी नाही
व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा मी नाही. आपत्तीच्या काळात घरात बसणारा शिवसैनिक असू शकत नाही. आम्ही वर्क फॉर्म होम करत नाही. संकटाच्या काळात शिवसैनिक घरात नाही तर शेतकऱ्यांच्या दारात गेला पाहिजे. शिवसैनिक स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांना मदत करतो. मदत करणाऱ्या शिवसैनिकाचा मला सार्थ अभिमान आहे.
विरोधकांना मदत नव्हे तर आमचा फोटो दिसला
शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. तेव्हा आम्ही थेट पाहणी करण्याऐवजी थेट त्यांना पहिली मदत केली. पण काही जण फक्त तिथे जाऊन पाहणी करून आले. आम्ही मदत केली तर त्यांना आमचा फोटो दिसला. त्यावरून त्यांनी राजकारण केलं. आम्ही जेव्हा तुमच्या काळात तुमचे फोटो लावून मदत करत होतो तेव्हा तुम्हाला मस्त वाटत होतं. पण आता आम्ही फोटो लावले तर त्यांना त्रास होत आहे. आम्ही मदत केली तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी नेला का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना साथीचे आजार होऊ नयेत म्हणून स्वच्छता मोहीम घेतली. तिथे डॉक्टरांच्या टीम गेल्या आहेत. पण काही लोक तिकडे तोड घेऊन गेले आणि तोंड वाजवत परत आले. हे लोक आमच्यावर टीका करत आहेत. त्यांना काय अधिकार आहे. ह्याचे दौरे म्हणजे ‘खुद को चाहीये काजू बदाम, पाणी मै उतरे तो सर्दी जुखाम’ असं आहे.
FAQ
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या संकटाबाबत काय म्हटले?
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतात चिखल, घरात पाणी शिरले आणि स्वप्ने वाहून गेली. त्यांना धीर देऊन म्हटले की, ‘धीर सोडू नका, टोकाचे पाऊल उचलू नका. शिवसेना तुम्हाला उभे करेल.’
शिवसेनेचे धोरण काय?
बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र ‘८०% समाजकारण, २०% राजकारण’ पाळून शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावत आहे. शिवसैनिक शेतकऱ्यांच्या दारात पोहोचतात आणि संकटकाळी वर्क फ्रॉम होम करत नाहीत.
शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल?
एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला की, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल. ‘यंदाची दिवाळी काळी होऊ देणार नाही’ असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. ते स्वतः शेतकऱ्यांचे मुलगे असल्याचे सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.