
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबीयांचे 3 ठिकाणी मतदान असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. कथित व्होट चोरीच्या मुद्यावरून काँग्रेसने देशभरात भाजप विरोधात रान पेटवले असताना पृथ्वीराज चव्ह
.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले आहे. या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोग व मोदी सरकारवर संगनमत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असताना भाजप आमदार अतुल भोसले यांच्या समर्थकांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचे एकाहून अधिक ठिकाणी मतदान असल्याचा आरोप केला आहे.
चव्हाण कुटुंबीयांची मतदार यादीत विविध ठिकाणी नावे
‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे 3 ठिकाणी मतदान आहे. एवढेच नाही तर इंद्रजीत चव्हाण यांच्या पत्नी, आई व मुलगा यांचेही मतदार यादीत 3 वेळा नाव आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे अन्य एक पुतणे राहुल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचेही 3 ठिकाणी मतदान आहे. विशेष म्हणजे या सर्वांनी वय बदलून नाव नोंदणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बोगस मतदान संशोधन समितीचे अध्यक्ष आहेत. पण त्यांच्याच मतदारसंघात अशा प्रकारे घोळ करणे नैतिकतेला धरून नाही. चव्हाण कुटुंबीयांनी दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघात दुबार, तिबार मतदान नोंदणी करून 2014 व 2019 च्या निवडणुकीत यश मिळवले. या प्रकाराला पृथ्वीराज चव्हाण यांची संमती होती का? असा सवाल भाजप आमदार अतुल भोसले यांचे समर्थक कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी उपस्थित केला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांनी व्होट चोरी केली आहे. कराडच्या पाटण कॉलनीतील घऱात 15 नावे आहेत. त्यातील अनेकजण त्या घरात राहत नाहीत. चव्हाण यांच्या घरातील 9 लोकांची नावे दुबार आहेत. यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाऊ, पुतणे, वहिनी यांच्यासह इतर कुटुंबीयांचा समावेश आहे, असेही ते या प्रकरणी म्हणालेत.
फडणवीसांनी मागितले राहुल गांधींकडे उत्तर
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. अतुल भोसलेंनी केलेल्या आरोपामुळे खरे व्होट चोर कोण आहेत हे समोर आले आहे. याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा…
शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राज्यपालांना पाठिंबा नाही:उद्धव ठाकरे सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार, फडणवीसांची माहिती
मुंबई – देशाच्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी व शिवसेना कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे आता स्पष्ट झाले आहे. पवारांनी या प्रकरणी विरोधी पक्षांच्या उमेदवाराच्या मागे आपली ताकद लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर ठाकरेंनी सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.