
तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागापूर येथील एका पेट्रोलपंपावर शुक्रवारी (दि. ४) रात्री दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी मिरची पुड टाकून पंपावरील कर्मचाऱ्यांकडून ३ लाख ६ हजारांची रोख लंपास केली होती. दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला असता पंपच्
.
मॅनेजर अभय नरेश राऊत (३२, रा. जळका पट), सेल्समन राहुल धनराज धोरते (२३, रा. सालोड, ह. मु. जळका), रितिक शंकर टेकाम (२२, रा. येणस), समित चंद्रकुमार कणसे (२७) आणि श्रावण ऊर्फ लहान्या राजेंद्र कणसे (१९, दोघेही रा. येणस) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. नागपूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नागापूर या गावाजवळ संतोष मुंदडा यांचा राघव पेट्रोल पंप आहे. या पंपवर अभय राऊत हा मागील अनेक वर्षांपासून मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तसेच राहुल धोरते हा याच पंपवर सेल्समन आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री ८ ते साडेआठच्या दरम्यान पेट्रोलपंपावर राहुल धोरते व सार्थक नगराळे हे कामावर होते. त्याचवेळी एका पांढऱ्या रंगाच्या इको कारमध्ये काही लुटारू आलेत, त्यांनी सार्थक नगराळेच्या चेहऱ्यावर मिरची पुड फेकली तसेच राहुल धोरतेला एका खोलीत बंद केले आणि त्याच खोलीत असलेली पैशांची लोखंडी पेटी घेऊन दरोडेखोर पसार झाले. या पेटीत ३ लाख ६ हजारांची रोकड होती, अशी माहिती अभय राऊतनेच पोलिसांना दिली. या घटनेमुळे तळेगाव दशासर पोलिसांसह अमरावतीहून एलसीबीचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तेथे कार्यरत दोघे, मॅनेजर व इतरांचीही चौकशी सुरू केली, तसेच वर्णनाप्रमाणे पांढऱ्या कारची माहिती घेणे सुरू केले. काही वेळानंतर अभय राऊत हाच या दरोड्याचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडून दरोड्यातील सहभागींच्या नावांची उकल केली. त्याने नावे सांगताच पोलिसांनी येणस गाठून रितिक टेकाम, समित कणसे आणि लहान्या कणसे या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनीही गुन्ह्याबाबत पोलिसांना कबुली दिली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीन तासांत ग्रामीण पोलिसांनी या दरोड्याची उकल केली. ही कारवाई एलसीबीचे पीआय किरण वानखडे, तळेगावचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे, पीएसआय सागर हटवार, पीएसआय मुलचंद भांबुरकर यांच्यासह पथकाने केली आहे. अभय राऊतने दरोडा पडल्याची माहिती देताना मालकाला सांगितले की, पंपवर दरोडा पडला, मी आताच पंपावरून निघालो आणि रस्त्यातच आहे, घरी अजून पोहोचलोच नाही. तसेच काही वेळानंतर त्याने अन्य एकाला सांगितले की, मी घरी होतो, तेव्हा मला दरोडा पडल्याचा फोन आला. त्याने दिलेल्या या दोन माहितीमुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला आणि त्याची पोलिसी भाषेत चौकशी करताच या गुन्ह्याचा उलगडा होऊन तो अडकला.
एकच माहिती दोन पद्धतीने दिली व मॅनेजर अडकला
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.